खो खो स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचे यश

By September 22, 2017 0

khedtimes.today |
राजगुरूनगर : क्रीडा व युवक संचालयात महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे व खेड तालुका क्रीडा संघटना आयोजित तालुका स्तरीय १७ वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या शालेय खो खो स्पर्धा श्री शिवाजी विद्यालय शेलपिंपळगाव ता.खेड जि.पुणे येथे सोमवार(दि.१८) रोजी पार पडल्या. या तालुकास्तरीय स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलांचा संघ उपविजयी झाला आहे, अशी माहिती प्राचार्य सुनिल जाधव यांनी दिली.

संघातील सहभागी खेळाडू पुढील प्रमाणे – झुंजरे संतोष, अन्सारी शहाबुद्दीन, कदम साहिल, पवार श्रीकांत, निमसे विजय, कदम ओंकार, शिंदे रोहित, माळी आकाश, लटपटे अभिषेक, नाईकडे ओंकार, मिरजे आकाश, माळी ओंकार वरील सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक अशोक सांडभोर, नितीन वरकड, संध्या कांबळे, पांडुरंग डावरे, सुभाष पडवळ यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विध्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे खेड तालुका एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. हरिभाऊ सांडभोर, सचिव एअर कमोडर, गणेश जोशी व शालासमिती अध्यक्ष प्रा. पांडुरंग होले व क्रीडा समिती अध्यक्ष मा. कैलास सांडभोर व सर्व संचालकांनी अभिनंदन केले.

Last modified on Friday, 22 September 2017 12:52