‘नृत्य मल्हार’मध्ये भैरवनाथ विद्यालय प्रथम

By October 09, 2017 0
‘नृत्य मल्हार’मध्ये भैरवनाथ विद्यालय प्रथम संतोष पारधी

khedtimes.today |
वाकी बुद्रुक : सह्याद्री वाहिनी व शरद मल्हार यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नृत्य मल्हार या स्पर्धेमध्ये वाकी बुद्रुक येथील भैरवनाथ विद्यालया च्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते विद्यालयात येऊन बक्षिसाचे वितरण करण्यात आले. बक्षीस मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे येथील सभागृहामध्ये दोन महिन्यांपूर्वी हि स्पर्धा घेण्यात आली होती. त्याच प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीवर करण्यात आले होते. या स्पर्धेत विशेष प्राविण्य गटात भैरवनाथ विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला, अशी माहिती बाळासाहेब नागवडे यांनी दिली आहे.

नृत्य मल्हार स्पर्धेचे संयोजक बाळासाहेब नागवडे तसेच जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते गुरुवार (दि.५)ऑक्टो रोजी भैरवनाथ विद्यालयात येऊन त्यांनी हे पारितोषिक वितरण केले.

या कार्यक्रमासाठी बाळासाहेब नागवडे, आरती केदारी, संदीप शिंदे, डॉ. किशु पॉल, लक्ष्मण टोपे, सुरेखा टोपे, उपसरपंच स्वाती टिपरे, शशिकला सोनवणे, सुनील टोपे, प्राचार्य व्यवहारे सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश लोखंडे यांनी केले. तर आभार अनिल धर्माधिकारी यांनी मानले.

Last modified on Monday, 09 October 2017 11:57