संत तुकाराम'कडुन खेडच्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान

By October 09, 2017 0
संत तुकाराम'कडुन खेडच्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान विवेक बच्चे

khedtimes.today |
शेलपिंपळगाव : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सुवालाल भागचंद बोरा, चिंचोशी(ता.खेड) व बाळकृष्ण तात्याबा कोळेकर, कोयाळी भानोबाची(ता.खेड) या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त ऊस उत्पादन केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या २०१६-२०१७ च्या गळीत हंगामात शेलपिंपळगाव गटातून सर्वाधिक ३७५ टन ऊस उत्पादन केल्याबद्दल सुवालाल भागचंद बोरा व भोसे गटातून सर्वाधिक ५१९ टन ऊस उत्पादन केल्याबद्दल बाळकृष्ण तात्याबा कोळेकर या खेड तालुक्यातील दोन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संत तुकाराम सांस्कृतिक भवन, कासारसाई दारुंब्रे(ता.मुळशी) येथे कारखान्याच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित कार्यक्रमात सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मा. खा. विदुरा नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मा. खा. अशोक मोहोळ, मा. आ. कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे, ज्ञानेश्वर दाभाडे, रविंद्र कलाटे, संचालक अनिल लोखंडे, ज्ञानेश नवले, कार्यकारी संचालक एस. जी.पठारे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Last modified on Monday, 09 October 2017 10:39