रानात जाऊन शिकवली रानवेडी कविता

By October 08, 2017 0

khedtimes.today |
पिंपरी खुर्द : येथील उपक्रमशील शिक्षक मनोहर मोहरे यांनी इयत्ता -तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील कवी तुकाराम धांडे यांच्या रानवेडी या कवितेला परिसर भेटी दरम्यान उजाळा दिला.

नुकतीच पिंपरी खुर्द शाळेची परिसर सहल सामाजिक वनिकरण व फार्म हाऊस येथे आयोजित केली होती. मुले डोंगरावर जाताच मोहरे सरांनी रानवेडी कवितेचा संदर्भ देत मुलांना कपारी, गडदी, नदी, टेकडी, पायवाटा व गायवाटा दाखवल्या. तसेच मुलांना टणटणी, करवंदाची जाळी, बुरांडीची व सोनकीची फुले यांचीही माहीती दिली.

मुलांना प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने खूपच उल्हासित झाली होती. दरम्यान मामाचं पत्र हरवलं, प्रश्नमंजूषा, कविता गायन, गप्पा, गाणी, गोष्टी, खेळ, यामधे मुले रंगून गेली होती. त्यांनी फार्म हाऊस मधील विविध फळझाडांची तसेच फुले, पिके याविषयी मुलांना माहीती दिली. बंदीस्त शेळीपालन, मत्स्य शेती, संकरीत गायी, म्हशींचा गोठा मुलांना दाखवण्यात आले. दिवसभर मुलांनी परिसर सहलीचा आनंद लुटला.

यावेळी शिक्षिका तृप्ती क्षीरसागर देखील उपस्थित होत्या.

Last modified on Sunday, 08 October 2017 15:35