वाकी बुद्रूक गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय जरे

By October 08, 2017 0
वाकी बुद्रूक : अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर जल्लोष करताना कार्यकर्ते. वाकी बुद्रूक : अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर जल्लोष करताना कार्यकर्ते. संतोष पारधी
  • उपाध्यक्ष पदी निलेश टोपे

khedtimes.today |
वाकी बुद्रूक : ग्रामपंचायत वाकी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय नारायण जरे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

भैरवनाथ मंगल कार्यालयात महात्मा गांधी जयंतीनिमित्त सरपंच विनोद पोपट टोपे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि.२) रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत लोकजनतेतून महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची नूतन कार्यकारणीची अध्यक्षांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीचे अध्यक्ष दत्तात्रय नारायण जरे व उपाध्यक्ष निलेश कुंडलिक टोपे यांना करण्यात आले.

दत्तात्रय जरे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सत्कारप्रसंगी जरे म्हणाले की, गावातील किरकोळ तंटे गावात मिटवून गावात शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पुढाकार घेणार आहे. पोलीस अधिकारी कुंभार साहेब आणि बधाले साहेब पोलीस व ग्रामस्थांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ग्रामसभा पार पडली. गावात नागरिक संवाद कार्यशाळा राबवून गावातील वादविवाद सामोपचाराने मिटविण्यात येतील, असेही ते यावेळी म्हणाले.

 

 

Last modified on Sunday, 08 October 2017 13:25