वडगाव घेनंद तंटामुक़्तीच्या अध्यक्षपदी अनिल बवले

By October 03, 2017 0
वडगाव घेनंद तंटामुक़्तीच्या अध्यक्षपदी अनिल बवले आनंदा घेनंद

khedtimes.today |
वडगाव घेनंद : गावच्या तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी अनिल बवले यांची निवड करण्यात आली आहे.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात येत असते. याच ग्रामसभेत गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची दरवर्षी निवड करण्यात येत असते. तब्बल चार तास चाललेल्या या निवडणूकीमध्ये बवले यांना १३८ मते मिळाली आणि अध्यक्षपदांची बाजी मारली.

यावेळी सरपंच ललिता नितनवरे, उपसरपंच मारूती बवले, राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ऋषिकेश पवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बवले यांच्या निवडीचे गावातील सर्वच गटातील ग्रामस्थांनी स्वागत करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Last modified on Wednesday, 04 October 2017 17:42