भात पीक फुलोर्‍यात

By October 09, 2017 0
भात पीक फुलोर्‍यात किशोर गिलबिले

khedtimes.today |
कोयाळी तर्फे वाडा : खेड तालुक्यातील पश्चिम भागातील कहू-कोयाळी, साकुर्डी, चिखलगाव, माजगाव, कळमोडी, औदर, देवोशी, धामणगाव येथे महत्वाचे खरीप पीक म्हणून भात पिक समजले जाते. या भागात इंद्रायणी, खडक्या, कोलम, रायभोग या भात पिकांच्या जातीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

यंदा सर्वत्रच भरपूर प्रमाणात वरुणराजाची कृपादृष्टी झाल्यामुळे या भागात भातपिक जोमात दिसत आहे. यंदाच्या समाधानकारक पावसामुळे भात पिकाच्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल, असे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

भात पिक फुलोर्‍यात असताना पावसाची गरज असते. परतीचा मान्सून भात पिके फुलोर्‍यात असताना पडल्यामुळे भात पिके जोमात दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधान दिसत आहे.

Last modified on Monday, 09 October 2017 11:49