आळंदी विकास आराखड्यातील स्वच्छता गृहामुळे शेतक-यांचे नुकसान

By October 12, 2017 0
आळंदी: तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्यातून लाखो रुपये खर्च करून विकसित केलेल्या स्वच्छतागृह युनिटची मैला साठवण टाकीचे गळतीने परिसरात घाणीचे साम्राज्य.  आळंदी: तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्यातून लाखो रुपये खर्च करून विकसित केलेल्या स्वच्छतागृह युनिटची मैला साठवण टाकीचे गळतीने परिसरात घाणीचे साम्राज्य. अर्जुन मेदनकर
  • स्वच्छतागृहे युनिटची टाकी दुरुस्तीसह गळती रोखण्याची मागणी

khedtimes.today |
आळंदी : येथील तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्यातून लाखो रुपये खर्च करून विकसित केलेल्या स्वच्छतागृह युनिटची मैला साठवण टाकीचे गळतीने परिसरात सांडपाण्यामुळे घाणीचे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यात लगतचे शेतक-यांचे शेतात घाण सांडपाणी जात असल्याने याचा परिणाम शेतीवर झाल्याने आर्थिक नुकसानीसह महसूल विभागाने पंचनामा करून अहवाल देण्याची मागणी आळंदीत करण्यात आली आहे.

या संदर्भात आळंदी नगरपरिषदेस येथील शेतकरी रामदास घुंडरे यांनी वेळोवेळी निवेदन देऊन लक्ष वेधले. येथील पद्मावती रस्त्यालगत परिषदेचा जुना कचरा डेपो आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात कचरा देखील साठला असून सदर कचरा डेपो परिषदेने बंद केला आहे. मात्र कचऱ्याची इतरत्र विल्हेवाट न लावता जागेवरच पडून आहे. या ठिकाणाहून कचरा हलविण्यासह सदर जागेस सीमा संरक्षक भिंत बांधण्याकडे देखील दुर्लक्ष झाल्याने शेतक-यात व नागरिकांत नाराजी आहे. सर्व्हे क्रमांक १२१ मध्ये येणारा कचरा व स्वच्छता गृहातील मैला मिश्रित दुर्गंधीयुक्त घाण सांडपाणी तात्काळ बंद करण्याची तसेच स्वच्छता गृहातील मैला साठवण टाकी गळती दुरुस्तीसह देखभाल करून टाकीची पर्यायी व्यवस्था इतरत्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. आळंदी महसूल विभागाने तसेच आळंदी नगरपरिषदेने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी नुकसान बाधित शेतकरी रामदास घुंडरे यांनी केली आहे. सन २०१३ पासून या बाबतचा पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र नगरपरिषद दुर्लक्ष करीत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सर्व्हे क्रमांक १२१ मधील नुकसानीचा पंचनामा करून महसूल विभासह आळंदी नगरपरिषदेने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी घुंडरे यांनी केली आहे. परिसरातील स्वच्छता गृहे प्रभावी स्वच्छते अभावी बंद असतात. यामुळे सदर परिसरातील रहिवाशी नागरिक सर्व्हे क्रमांक १२२ परिसरात मध्ये उघड्यावर नैसर्गिक विधीस जातात असे येथील नागरिक अप्पासाहेब चिताळकर यांनी सांगितले.

आळंदी नगरपरिषदेने आळंदी हगणदारीमुक्त शहर घोषित केले असून या अंतर्गत पारितोषिकात सुमारे ३० लाख रुपयांचे पहिल्या टप्प्यातील निधी देखील स्वीकारला आहे. मात्र पुढील प्रभावी नियोजनाकडे स्वच्छता गृहे परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होताना दिसत असल्याने परिसरातून नागरिक व शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. राज्य शासनाने मंजूर केलेल्या आळंदी तीर्थक्षेत्र आराखड्यातील स्वच्छता गृहांची युनिट काही ठिकाणी विकसित न केल्याने यात्रा काळात भाविकांचे स्वच्छता गृहाचे अभावी लगतच्या ग्रामपंचायत परिसरात ताण येत आहे. आळंदी परिसरातील मोकळ्या जागेत भाविक नैसर्गिक विधी उरकतात. याकडे येत्या यात्रेपूर्वी प्रभावी नियोजन करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. आळंदी मरकळ रस्त्या लगत अजून एकही ठिकाणी आळंदीत सार्वजनिक स्वच्छता गृह नसल्याने भाविकांसह नागरिकांची गैरसोय होत आहे.

भैरवनाथ चौकात देखील पालिकेच्या मालकीचे तसेच स्वच्छता गृहासाठी राखीव जागेत बांधकाम सुरु करण्याची मागणी असताना देखील अजून कामकाज सुरु नसल्याने गैरसोय होत आहे. शेतात येणारा कचरा वेळोवेळी इतरत्र उचलून टाकावा लागत आहे. यात वेळेसह शेतीचे तसेच आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Last modified on Thursday, 12 October 2017 12:58