आळंदी मरकळ रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

By October 08, 2017 0
  • प्रवासी वाहनचालक त्रस्त ; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

khedtimes.today |
आळंदी : आळंदी-मरकळ रस्त्यावर चऱ्होली खुर्द हद्दीत मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्याने अपघातांचे संख्येत वाढ झाली आहे. यामुळे वाहन चालक, नागरिक त्रस्त झाल्याने नाराजीत वाढ झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्ता दुरुस्तीची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीचे वतीने जिल्हाध्यक्ष अक्षय रंधवे, पश्चिम महाराष्ट्र सचिव संतोष डोळस यांनी केली आहे.

तीर्थक्षेत्र आळंदीला जोडणारा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून महामार्गाचे रस्त्यासाठी असलेल्या निकषांप्रमाणे या रस्ते विकासासाठी बांधकाम विभागाकडून काम होताना दिसत नाही. अनेक अपघात या मार्गावर झाले आहेत. सुयश मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुतर्फा सांडपाणी खड्ड्यामध्ये साचून वाहन चालकांचा खड्ड्याचा अंदाज चुकून वाहने खड्ड्यात आढळून वाहनांचे तसेच वाहनचालकांचे नुकसान होत आहे. यामुळे प्रवासी, चालक, वाहक यांचे आर्थिक नुकसान होऊन वेळेचीही नुकसान होत आहे.

कमी अंतराचे प्रवासास मोठा वेळ लागत आहे. यातून नाराजीचा सूर परिसरात शासनाचे कामकाजावर ओढला जात आहे. वाहन चालक आणि पादचारी, दुचाकी चालक यांना आपला जीव मुठीत ठेवत प्रवास करावा लागत आहे. अनेक प्रवासी या मार्गावर प्रवास करताना जखमी होऊन त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकाऱयांनी या रस्ते विकास कामाची पाहणी करून तात्काळ रस्ते दुरुस्तीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी आळंदी परिसरातून जोर धरत आहेत.

या रस्त्यावर प्रचंड वाहतूक असून अवजड वाहनांची संख्या देखील मोठी आहे. मरकळ औद्योगीक नगरीत येणारी व जाणारी वाहने यात भर घालत आहेत. दिवस होणारी अवजड वाहतूक यामुळे देखील नागरिक त्रस्त आहेत. यात रस्त्याची दुरावस्था असल्याने आणखीच भर पडते. या रस्त्याची देखभाल दुरुस्ती व पाहणी तात्काळ करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीचे वतीने करण्यात आली आहे.

Last modified on Sunday, 08 October 2017 16:08