khedtimes.today |
नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेवर केलेल्या टीकेला त्यांचेच पुत्र आणि केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्टिकरण दिले आहे. नवभारताच्या उभारणीसाठी रचनात्मक सुधारणा होणे गरजेचे आहे. केवळ 1-2 तिमाहीमधील विकासदर आणि अन्य मॅक्रो डाटा हे दीर्घकाळ चालणाऱ्या आर्थिक सुधारणांचे विश्‍लेषण करण्यासाठी अपुरे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

यशवंत सिन्हा यांनी काल एका लेखातून देशाच्या अर्थकारणावर केलेल्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न जयंत सिन्हा यांनी एका स्वतंत्र लेखाद्वारे केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेपुढील आव्हानांबाबत काही लेख सातत्याने लिहीले जात आहेत. या लेखांमध्ये काही निवडक तथ्यांच्या आधारानेच निष्कर्श काढले जात आहेत. मात्र देशाच्या अर्थकारणामध्ये मूलभूत रचनात्मक सुधारणांबाबत या लेखांमध्ये काहीच नसते. केवळ 1-2 तिमाहीतील विकासदर आणि काही मॅक्रो डाटा हा दीर्घकाळाच्या आर्थिक सुधारणांचे विश्‍लेषण करण्यास अपुरा आहे, असे ते म्हणाले.

नव्याने साकारत असलेली अर्थव्यवस्था अधिक पारदर्शक, जागतिक पातळीवर अधिक किफायतशीर आणि नाविन्याला चालना देणारी असणार आहे. सर्व भारतवासियांना अधिक चांगले जीवनमान देणारी ही अर्थव्यवस्था असणार आहे, असेही जयंत सिन्हा यांनी म्हटले आहे.

khedtimes.today |
बारामती : 5 वी आंतरराष्ट्रीय फार्म टुरिझम कॉन्फरन्स सोमवार (दि. 2), मंगळवार (दि. 3), बुधवार (दि. 4 ऑक्‍टोबर) दरम्यान फिलिपिन्स येथे होत असून त्या कॉन्फरन्समध्ये सहभाग घेण्यासाठी बारामती येथील कृषी पर्यटन विकास संस्था (एटीडीसी) यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषेदेला, महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्र चालक 15 शेतकरी जाणार !!

फिलिपिन्स पर्यटन मंत्रालय, फिलिपिन्स कृषी मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय शाश्‍वत पर्यटन विकास संस्था फिलिपिन्स यांनी संयुक्‍तरित्या ही कॉन्फरन्स आयोजित केली आहे. फिलिपिन्स देशात 2014मध्ये फार्म टुरिझम (कृषी पर्यटन) चा ऍक्‍ट पास झाला असून, कृषी पर्यटन करणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींना खूप अनुदान दिले जाते.

फार्म टुरिझम कॉन्फरन्स दरम्यान, अनेक देशातील कृषी पर्यटन केंद्र चालक येणार असून त्याचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे, वेगवेगळ्या कृषी पर्यटन केंद्राना भेटी सुद्धा दिल्या जाणार आहेत. भारताचे प्रतिनिधित्व कृषी पर्यटन विकास संस्था करणार असून पांडुरंग तावरे यांचे प्रेझेंटेशन सुद्धा होणार आहे, त्यामुळे भारतातील कृषी पर्यटन क्षेत्राच्या घडामोडी जगभरातील आलेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत. महाराष्ट्रातील कराड येथील आपले गाव कृषी पर्यटन केंद्राचे काटकर, थेऊर येथील कल्पतरू बाग कृषी पर्यटन केंद्राचे प्रतीक कंद, बारामती येथील बारामती कृषी पर्यटन केंद्राचे भगवान तावरे व सिंधु तावरे, आमखेड (वाशीम) येथील भूमी कृषी पर्यटन केंद्राचे अविनाह जोगदंड, वेरुळे येथील पुंडलिक वाघ, प्रकाश पावडे, नेताजी खंडांगळे, रामचंद्र शेळके, अरुण कुमार क्षीरसागर, सुनील खळदकर यांचा समावेश आहे.

हे 15 जण सिंगापूर मलेशिया येथील कृषी पर्यटन केंद्रांना भेटी देणार असून मार्गदर्शन घेणार आहेत. मलेशिया सरकारचे 927 हेक्‍टर वर पसरलेले मलेशिया ऍग्रीकल्चर पार्क सॅलॅंगोर हे महत्वाचे कृषी पर्यटन केंद्र पाहणार असल्याचे बारामती कृषी पर्यटन विकास संस्थे (एटीडी सी) चे कार्यकारी संचालक आणि कृषी पर्यटन संकल्पने जनक पांडुरंग तावरे यांनी सांगितले.

राजगुरूनगर : गेली अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला राजगुरुनगर नगर परिषदेच्या आकृतीबंधाला अखेर मंजुरी मिळाली असून राजगुरुनगर नगरपरिषदेत राज्यस्तरीय वर्गातील ११ व राज्यस्तरीय संवर्गातील पदांव्यतिरिक्त २८ पदे भरण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे, प्रभारी मुख्याधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.

राजगुरुनगर शहराचा आकृतीबंध मंजुरीबाबत काल(दि.२६)रोजी मंत्रालयात नगराध्यक्ष बापू थिगळे, उपाध्यक्ष संदीप सांडभोर, नगरसेवक मनोहर सांडभोर यांनी प्रत्यक्ष भेट मजूर पदांचा जीआर पाहून राजगुरुनगर नगर परिषदेत मंजूर झालेली पदे तत्काळ भरण्याची नगरविकास विभागाच्या सचिवांकडे मागणी केली. याबाबतची माहिती देण्यासाठी आज नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे, प्रभारी मुख्याधिकारी राजेंद्र जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली या प्रत्रकार परिषदेला नगरसेवक सुरेखा क्षोत्रीय, मनोहर सांडभोर, सचिन मधवे, किशोर ओसवाल, सुरेश कौदरे उपस्थित होते. राजगुरुनगर नगर परिषदेचा आकृती गेली अनेक दिवसांपासून सरकारच्या उदासीनतेमुळे लालफितीत अडकला होता. राजगुरुनगरचा आकृतीबंध लवकर मंजूर होण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले होते मात्र गेली दीडवर्षे तो मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. आकृतिबंध मंजूर नसल्याने शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित होते. अपुरा आणि प्रशिक्षित स्टाफ नसल्याने राजगुरुनगर शहरातील अनेक कामे ठप्प होती. जे कामगार काम करीत होते त्यांना पुरेसा पगार मिळत नव्हता. पाणी आरोग्य स्वच्छता आदी विभागातील कामांना गती नव्हती. लेखापाल, कर निरीक्षक, स्थापत्य अभियंता, स्वच्छता अभियंता आदी महत्वाचे अधिकारी नसल्याने विकासात आणि कामात अनेक अडथळे येत होते.

राज्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगरपरिषद, नगरपंचायती या नागरी स्थानिक संस्थामधील पाधांच्या आकृतीबंधास शासनाने दि २२ सप्टेंबर २०१७ ला मान्यता दिली आहे. राज्यातील २७ नगरपरिषदा, नगरपंचायती यांच्या आकृतीबंधास शासनाने मान्यता दिली असून पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर ही एकमेव नगर परिषद आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या आकृतीबंधात शासनाने मंजूर केलेली पदे कंसांत संख्या पुढील प्रमाणे:राज्यस्तरीय संवर्गातील पदांव्यतिरिक्त पदे : लिपिक/टंकलेखक (१० पदे), स्वच्छता निरीक्षक (३ पदे), गाळणी चालक/प्रयोगशाळा सहाय्यक(१ पद),पंप ऑपरेटर/ वीजतंत्र/जोडारी(३ पदे), तारतंत्री/वायरमन (३ पदे), शिपाई (३ पदे), मुकादम (४ पदे), व्होल्वमन (१ पद), राज्यस्तरीय संवर्गातील पदे : सहाय्यक कार्यालय अधीक्षक (एक पद),सहाय्यक मालमत्ता पर्यवेक्षक(१ पद), सहाय्यक समाजकल्याण माहिती व जनसंपर्क अधिकारी( १ पद), करनिरीक्षक(१ पद), लेखापाल(१ पद), लेखा परीक्षक( १ पद), स्थापत्य अभियंता ग्रेड-अ (२ पदे), पाणीपुरवठा मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता ग्रेड-अ (२ पदे), नगररचनाकार सार्वजनिक बांधकाम ग्रेड अ (१ पद).

राज्यातील आकृतीबंध मंजूर करण्यात आलेल्या २७ नगरपरिषद, नगरपंचायतीची नावे कणसात जिल्हा पुढील प्रमाणे: राजगुरुनगर (पुणे), खंडाळा, मढा, कोरेगाव, पाटण, दहिवडी, खटाव, वडूज(सातारा), खानापूर, कवठेमहांकाळ,शिराळा, कडेगाव, पलूस(सांगली), वाडा, विक्रमगड, तलासरी,माखाडा (पालघर), देवगड-जामसांडे (सिंधुदुर्ग), वाडवड, वरणगाव (जळगाव), रेणापूर (लातूर), सिंदेवाही, गडचांदूर, नागभीड(चंद्रपूर), पारशिवणी, वाडी, वानाडोंगरी (नागपूर), हुपरी(कोल्हापूर).

राज्य शासनाने राजगुरुनगर नगर परिषदेत ३९ अधिकारी कर्मचारी यांना मान्यता दिल्याने त्यांच्या पगारापोटी वर्षाला ९४ लाख ३२ हजार १८० रुपये खर्चाची तरतूद केली आहे. राज्य शासनाकडून राज्यस्तरीय संवर्गातील ११ पदे येत्या १५ दिवसांत भरली जाणार असून राज्यस्तरीय संवर्गातील पदांव्यतिरिक्त २८ पदे भरण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असल्याने त्यांच्याकडे प्राप्त प्रस्तावानुसार ही पदे भरण्यात येणार आहेत. राजगुरुनगर नगरपरिषदेत सफाई कर्मचायाबाबत मात्र निर्णय झाला नाही. २५ हजार लोकसंख्येप्रमाणे हजारी एक कर्मचारी असा जीआर मध्ये उल्लेख असून त्याच्या ५० टक्के कर्मचारी भरण्याचा प्रस्ताव असून हा निर्णय विभागीय आयुक्त घेणार आहेत. राजगुरुनगर नगर परिषदेत सध्या २०० पेक्षा जास्त कर्मचारी असून त्याबाबतचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहे.

याबाबत नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे म्हणाले कि, शासनाने आकृती बंध मंजूर केल्याने ३९ कायमस्वरूपी पदांना मान्यता मिळाली आहे. राज्य शासनाकडून राज्यस्तरीय संवर्गातील ११ महत्वाची पदे येत्या १५ दिवसांत भरण्यात येणार असल्याने शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. विकास कामांना गती मिळेल, पाणी आरोग्य स्वच्छता याबाबत तत्काळ निर्णय मार्गी लागतील कर निर्धारणा वेळेत होवून नगर परिषदेचा महसूल वाढेल. लेखापाल आल्यानंतर अनेक प्रलंबित देणी देण्याच्या अडचणी दूर होतील.

चिंबळी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या गोडी बरोबरच प्रत्येक सण उत्सव व इतर धार्मिक समारंभाची माहिती मिळावी व एकसंघ भावना त्यांच्या वाढीस लागून ती जोपासली जावी याकरीता दरवर्षी विविध उत्सवांप्रमाणेच नवरात्र उत्सवाचे श्रीसर्मथ स्कुल व कॉलेजच्या वतीने आयोजित केले असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे यांनी सांगितले.

चिंबळी फाटा ( ता. खेड) येथील श्रीसमर्थस्कूल व कॉलेजच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्साहानिमित्त रासदांडिया व भोंडला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा शुमारंभ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे यांच्या हस्ते हत्तीच्या चित्राचे पूजन करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

यावेळी स्कुलच्या प्राचार्य अनिता टिळेकर, कार्याध्यक्षा विद्या गवारे, वर्गशिक्षिका ललिता बडदे, शोभा तांबे यांच्यासह शिक्षकवृंद पालक व विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, विद्यार्थिनींनसह महिला शिक्षकांनी गोल रिंगण धरून भोंडला व पारंपारिक गीत सादर केल्याचे स्कुलच्या प्राचार्य अनिता टिळेकर यांनी सांगितले.

मरकळ : (ता. खेड) येथील नवीन माध्यमिक विद्यालयात विज्ञान छंद मंडळाच्या वतीने अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या विज्ञान मेळाव्याचे उद्‌घाटन विद्यालयाचे पर्यवेक्षक एस. एस. सुतार यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, सुप्त गुणांना वाव मिळावा, नवीन संशोधक तयार व्हावे आदी उद्देशाने या विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्या आले होते. दरम्यान विद्यालयात विज्ञान मंच, विज्ञान छंद मंडळ हे विभाग सुरू करण्यात आले आहे. या विज्ञान मेळाव्यात विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगाचे सादरीकरण केले.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी व विद्यार्थांना विद्यालयातील विज्ञान शिक्षक सुषमा खैरनार, अनिता लांडगे, राजश्री आखाडे, माधुरी शिकारे, रूपाली आहेर, एस. एच. खैरे, एच. बी. धराडे, एम. एस. बोडके, एस. एस. थोरात, स्वप्निल लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. आशा विज्ञान मेळाव्यामधून विद्यार्थांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण होईल, व यांच्या मधुनच उद्याचे अब्दुल कलाम, रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर या सारखे वैज्ञानिक निर्माण होतील, असे मत पर्यवेक्षक एस. एस. सुतार यांनी व्यक्‍त केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

चिंबळी : येथील ग्रामदैवत असलेल्या पद्मावती व भैरवनाथ मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदाही घटस्थापनाकरून नवरात्र उत्सावास मोठ्या उत्साहात सुरू आहे.

रोज सकाळी व सायंकाळी आरतीचा व देवीची गाण्याचा व संगीत भजनी मंडळाचा कार्यक्रम रंगत असून कार्यक्रमाला महिला व नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, बुधवारी (दि 27) सातव्या माळेनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने होमहोवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी दर्शनासाठी व आरतीसाठी ग्रामस्थ मोठ्या सख्यंने उपस्थित होते.