khedtimes.today |
नवी दिल्ली : देशात आजपासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) खातेधारकांसाठी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. या नव्या नियमांबाबत माहिती  जाणून घेऊ यात.

एसबीआयकडून खातेधारकांना दिलासा- एसबीआयने मेट्रो शहरांमध्ये खात्यात किमान रक्कम ठेवण्याची मर्यादा 5 हजारांहून 3 हजार रुपये केली आहे. यामुळे जवळपास 5 कोटी ग्राहकांना फायदा होईल. शिवाय यावरील दंडाच्या रक्कमतेही कपात करण्यात आली आहे. यापूर्वी किमान रक्कम न ठेवल्यास 40 ते 100 रुपये वसूल केले जात होता. त्यावर सर्व्हिस टॅक्सही होता. मात्र आता ही मर्यादा 30 ते 50 रुपये करण्यात आली आहे. सततचा विरोध आणि सरकारच्या आवाहनानंतर एसबीआयने हा निर्णय घेतला. एसबीआयने पेन्शन धारक, सरकारी योजनांचे लाभार्थी आणि अल्पवयीन खातेधारकांना किमान रक्कम ठेवण्याच्या मर्यादेतून बाहेर ठेवलं आहे.

जुने खाते बंद करण्यासाठी फी नाही- एसबीआयमधील खाते बंद करण्यासाठी फी लागणार नाही. मात्र खाते एका वर्षापेक्षा अधिक दिवसांचे असणं गरजेचे आहे. एखादं खातं 14 दिवसांनंतर आणि एका वर्षाच्या आत बंद केल्यास 500 रुपये आणि जीएसटी द्यावा लागेल.

जुने चेक होणार रद्द- ज्या ग्राहकांकडे एसबीआयमध्ये मर्ज झालेल्या बँकांचे चेक आहेत, ते चेक यापुढे अमान्य करण्यात येतील. या बँकांचे जुने चेक आणि आयएफएससी कोड 30 सप्टेंबरनंतर चालणार नाहीत.

khedtimes.today |
नारायण राणे यांनी नवीन पक्षाची आज घोषणा केलीये. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष असे राणेंच्या पक्षाचे नाव आहे.

दरम्यान यावेळी राणेंनी शिवसेनेवरही टीका केलीये. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असून कंत्राटात टक्केवारी द्यावी लागते. भ्रष्टाचारामुळेच मुंबईत मराठी माणसाला घर घेता येत नाही. महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असल्याने उद्धव ठाकरेंना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली.

इस्लमाबाद : भारत- पाकिस्तानमध्ये द्विदेशीय क्रिकेट मालिका होत नसल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ७ कोटी डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) केली आहे. याबाबत येत्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडेही (आयसीसी) तक्रार करणार आहोत असे पीसीबीने म्हटले आहे.

बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळामध्ये २०१४ मध्ये करार झाला होता. यानुसार दोन्ही देशांमध्ये २०१५ ते २०२३ या कालावधीत सहा मालिका रंगणार होत्या. यात भारतीय संघाच्या पाक दौऱ्याचाही समावेश होता. आयसीसीच्या मालिकेमध्ये भारत- पाक आमनेसामने आले असून यावर भारताने आक्षेप घेतला नाही याकडे पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी लक्ष वेधले. भारतातील सरकारने बीसीसीआयला संघ पाठवण्यास परवानगी दिली नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.

आम्ही बीसीसीआयकडे त्रयस्थ ठिकाणी सामने खेळवण्याचा प्रस्तावही दिला. २०१६ मध्ये आम्ही श्रीलंकेत वन- डे मालिका खेळवण्याचा प्रस्ताव दिला होता असा दावा त्यांनी केला. भारत- पाक मालिकेसाठी आम्ही तयार आहोत. मात्र भारत या मालिकेसाठी तयार नाही. त्यामुळे आमचे कोट्यवधींचे नुकसान होत असल्याचे सेठी म्हणालेत.

युरोपमधील कायदेतज्ज्ञांकडून सल्ला घेतल्यानंतर पीसीबीने भारताकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. बीसीसीआयने ७ कोटी डॉलर्सची भरपाई द्यावी अशी मागणी पीसीबीने केली. आगामी काळात पीसीबी याबाबत आयसीसीकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. २००७ मध्ये पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. त्यानंतर आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये कोणतीही स्पर्धा झाली नाही. तर २००९ मध्ये श्रीलंका संघावरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकमध्ये आंतरराष्ट्रीय सामने झालेले नाहीत. यामुळेही पीसीबीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सेठींनी म्हटले आहे.

  • 16 वर्षांखालील मुलांसाठी स्पर्धा
  • 11 राज्यांतील 24 संघांचा सहभाग
  •  8 गटांमध्ये विभागणी

khedtimes.today |
पुणे : एसएनबीपी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजतर्फे दुसरी एसएनबीपी ऑल इंडिया हॉकी स्पर्धेला रविवार दिनांक 1 ऑक्‍टोबर रोजी प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा (16 वर्षांखालील मुलांसाठी) आयोजित करण्यात आली असून, यंदा 11 राज्यांमधून 24 संघांनी सहभाग नोंदवला आहे. रविवार दिनांक 1 ते 7 ऑक्‍टोबर दरम्यान बालेवाडी येथे होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी संघांची 8 गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटातील विजेता संघ उपान्त्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहे.

प्रत्येक गटात तीन संघांचा समावेश केला असून एक ते चार ऑक्‍टोबर दरम्यान साखळी पद्धतीने स्पर्धा घेण्यात येणार आहेत. पाच ऑक्‍टोबरला उपान्त्यपूर्व फेरी, सहा ऑक्‍टोबरला उपान्त्य फेरी आणि सात ऑक्‍टोबरला अंतिम सामना आणि तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना होणार आहे, अशी माहिती एसएनबीपी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि एसएनबीपी ऑल इंडिया हॉकी स्पर्धेच्या अध्यक्ष डॉ. वृषाली भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एसएनबीपी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या संचालिका देवयानी भोसले-पांचगे, एसएनबीपी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या संचालिका ऋतुजा भोसले, स्पर्धेच्या आयोजन समितीचे सचिव विभाकर तेलोरे, तसेच स्पर्धेचे संयोजक फिरोज शेख उपस्थित होते.

स्पर्धेचे उद्‌घाटन रविवार, एक ऑक्‍टोबर रोजी सकाळी दहा वाजता आंतरराष्ट्रीय हॉकीपटू युवराज वाल्मिकी आणि देवेंद्र वाल्मिकी यांच्या हस्ते होणार असून, यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव संघटनेचे बाळासाहेब लांडगे, हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मनीष आनंद, हॉकी महाराष्ट्रचे सचिव मनोज भोरे, क्रीडा युवाचे साहाय्यक आयुक्‍त आनंद व्यंकेश्वर, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, तसेच आंतरराष्ट्रीय टेनिसपटू नितीन कीर्तने उपस्थित रहाणार आहेत.

तसेच यावेळी हॉकीक्षेत्रासाठी बहुमोल योगदान देणारे आंतरराष्ट्रीय हॉकीपटू रमेश पिल्ले, ऑलिम्पिकपटू अजित लाकरा, पी.डी. बारलान, आंतरराष्ट्रीय पंच हॅरी ऍन्थोनी, राष्ट्रीय खेळाडू यशोधन पवार, देवदास मार्टिन, गोंविंद स्वामी पिल्ले, स्टॅन्ली डिसोजा, प्रशिक्षक एडविन मोती जॉन, राष्ट्रीय पंच सादिक शेख, श्रीधरन तंबा या पुण्यातील, तर राष्ट्रीय प्रशिक्षक अजिज सैयद (नाशिक), मनोज भांडवले (कोल्हापूर), मेराज पटेल उर्फ बावा (मुंबई) यांचा गौरव करण्यात येणार आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना 30 हजार रुपये, उपविजेत्या संघास 20 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या संघास 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून, एकूण एक लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एम.पी. ऍकॅडमीने विजेतेपद पटकावले होते. तर मुंबई असोसिएशनच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले होते.

khedtimes.today |
नागपूर : भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच वनडे  सामन्यातील शेवटचा सामना आज नागपूरमधील जामठा स्टेडियमवर रंगणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १:३० वाजेपासून या सामन्याला सुरूवात होईल.  भारताने या ५  सामन्याच्या मालिकेतील  ३ सामने जिकून ही मालिका आधीच आपल्या नावे केली आहे. तर या मालिकेतील चौथा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता . पाचवा  सामना जिकूंन  या मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी  दोनही  संघ उत्सुक असतील. दुसरीकडे भारताला वनडे मधील आपले प्रथम स्थान कायम राखायचे असल्यास हा सामना जिंकावाच लागेल .

गेल्या सामन्यातील विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे मनोबल नक्कीच उंचावले असेल. पण या सामन्यात त्यांना कामगिरीत सातत्य राखता येते का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. डेव्हिड वॉर्नरने गेल्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला होता. आरोन फिंचही दमदार फलंदाजी करत आहे. स्टीव्हन स्मिथ आणि मार्क्स स्टोइनिस या दोघांनी आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ऑस्ट्रेलियाला मोठय़ा अपेक्षा असतील. मात्र, मालिकेचा विचार केला तर ऑस्ट्रेलियाला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये छाप पाडता आलेली नाही. पण गेल्या सामन्यातील विजय त्यांच्यासाठी संजीवनी देणारा ठरू शकतो.

जामठाची खेळपट्टी ही भारतासाठी जास्त फलदायी ठरलेली नाही. चार वर्षांपूर्वी या दोन्ही संघांतील सामन्यात  ऑस्ट्रेलियाने ३५० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्याचबरोबर २०१६ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला न्यूझीलंडने ७९ धावांमध्ये तंबूत धाडले होते. २०१५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना येथे झाला होता आणि आयसीसीने खेळपट्टीवर नाराजी दर्शवली होती. पण ही खेळपट्टी नव्याने बनवण्यात आली असून एक चांगला सामना पाहायला मिळेल, अशी आशा क्युरेटर प्रवीण हिंगणीकर यांनी व्यक्त केली आहे.

  • संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, हार्दिक पांडय़ा, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.

ऑस्ट्रेलिया : स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, हिल्टन कार्टराइट, ट्रेव्हीस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, जेम्स फॉल्कनर, नॅथन कोल्टर-नाइल, पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, अ‍ॅश्टॉन अगर, अ‍ॅडम झम्पा, पीटर हॅण्ड्सकोम्ब, आरोन फिंच.

khedtimes.today |
शिर्डी :जगभरातील भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले साईबाबांचे शिर्डी अखेर हवाई मार्गाने जोडले गेले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज  शिर्डी विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले असून राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

शिर्डीमध्ये विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी १९९० च्या दशकात करण्यात आली होती. हवाई सेवेमार्गे शिर्डीला पोहोचण्यासाठी मुंबई किंवा औरंगाबादला उतरावे लागते. मुंबईपासून सुमारे पाच- साडेपाच तास, तर औरंगाबादहून तीन तास प्रवास करुन शिर्डीला जाता येते. शिर्डीत रेल्वे स्थानक आहे. मात्र लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांनी जायचे झाल्यास कोपरगाव किंवा मनमाडला उतरावे लागते. शिर्डीत राज्यासह देशविदेशातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्याने शिर्डीत विमानतळ व्हावा अशी मागणी केली जात होती.

अखेर दोन तपांच्या प्रतीक्षेनंतर शिर्डी विमानतळाचे काम मार्गी लागले  आहे. राहता तालुक्यातील काकडी गावात हे विमानतळ असून या विमानतळाचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.  शिर्डीत विमानतळ झाल्याने आता मुंबईतून शिर्डीला ३५ मिनिटांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे.

सध्या शिर्डी विमानतळावरून  दिवसा विमाने उड्डाण करू शकतील. रात्री विमानसेवा सुरू व्हावी, म्हणून धावपट्टी वाढविण्याचे काम सुरू आहे. ते काम जानेवारीत पुर्ण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने बांधलेला हा पहिलाच विमानतळ असून त्याचे नियमनही हिच कंपनी करणार आहे. देशात आतापर्यंत भारतीय विमानतळ प्राधिकरण विमानतळाची उभारणी करून तिचे संचलन करते. पण एखाद्या राज्याने असा उपक्रम करण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

khedtimes.today |

सुगीचा हंगाम झाला. शेतीतल्या कामाला थोडी उसंत मिळाली होती. सालभराचं धान्य कणगीत भरलं अन डाळ - दाणा गणगीत, उतरंडीत भरला. धान्याची पोती तालुक्याच्या आडतीवर रिकामी झाली, शेतकर्‍याच्या हातात चार पैसे खुळखुळ लागलं, बाया-बापड्याच्या अंगावर नवी कापडं दिसू लागली, पारावर माणसांच्या गप्पा टप्पांना उत आला, पान-तंबाखूच्या पिचकार्‍यांनी पाराचे कोपरे रंगू लागले. बिड्यांची बोडकं भोवताली साठू लागली. रगाट पोरं तालमीत कसरती करायले, अन म्हातारी कोतारी जेवणं आटोपून चावडीत पारावर निवांत झोपत. उनाड पोरांची खसखस व्हायची, म्हातारी कावायची अन पोरांना पुन्हा चेव यायचा.

गायरानात मसानजोगी पालं ढोकून तयार झाले. कैकाडी, वढार, पाथरवट मिळल त्या जागेत गाववस्तीला उतरले. हळूहळू गायरान गजबजून गेलं. त्यांची उघडी-नागडी पोरं गायरानात खेळू लागली. कोंबडया, कुत्री, मांजरं, गाढवं थोडे फिरू लागले, एखादं पाल ठोकून नंदीबैलवाले ही हजर होत. बंगाडी आईचा देव्हारा, दरदेशी ही भटकंती करून गुजरान करणारी मंडळी गावगाड्यात सामील होत असायची.

दिवस उगवताच गावाच्या मध्यभागी असणार्‍या पिंपळाच्या झाडावर पांगूळ चढून गाणी म्हणायचे अन झाडाखाली अंथरलेल्या बारदानावर आया - बाया सुपातनं धान्य टाकायच्या. भल्या पहाटेच ‘दान पावलं’ अशी आरोळी ठोकत वासुदेव मुखामध्ये देवाची गाणी म्हणत दारोदार फिरायचे त्यांच्या झोळीत चिपटं आठवाभर धान्य पडायचं, आई -वडील अन सासू सासरे यांच्या पुण्याईचा आर्शिवाद देऊन वासुदेव पुढच्या आळीचा रस्ता ओलांडायचा. गाव दान धर्म करण्यात धन्यता मानत होता.

मसानजोगी या जमातीची पालं मात्र मसनवाट्यात असायची, कदाचीत म्हणूनच हे नाव पडलं असावं. त्यांची एकदंरीत वेशभुषा ही भयावह असायची, डोक्याला अनेक प्रकारच्या पिसांचा टोप, चेहर्‍यावर भयानक रंगरंगोटी, गळ्यात मानवी ढगाळ असा अंगरखा, हातात वेडीवाकडी भली मोठी घाटी, हातात अनेक प्रकारची कडे, घाटीचा ‘घळांग...घळांग’ असा आवाज येताच लहान पोरं घाबरून घरात लपायची, धान्य, शिधा, भिक्षा घेण्यासाठी मजबूत गोंधडी सारख्या काखेत अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी पिशव्या असायच्या. ते महादेवाचं नाव घेऊन भिक्षा मागताच येवढचं कळायचं, बाकी ते काय गाणी म्हणतात हे मात्र कळत नसायचं. गावकुसा आतील आणि गावकुसाबाहेरची राहणारी मंडळी यांचे स्वतंत्र मसनवाटे असायचे. बहुतांस या जागा गावच्या ठराविक भागात असायच्या, मुस्लीम धर्माचा मात्र एकच असायचा. काही माणसे प्रेताला अग्नी देत असत तर काही प्रेत मातीआड करत. प्रेत गाडण्यासाठी खोदलेल्या खड्याला ‘गार’ असे म्हणत. सवंसाज झाल्यावर किंवा रात्रीच्या वेळेस सहसा माणसं या भागाकडे फिरकत नसत. परंतु मसानजोगी ही जमात मात्र याच ठिकाणी प्रामुख्याने वास्तव्य करून रहात होती. त्यांची बायका - पोरं जणू काही घरादारात वावरल्या सारखी होती.

गावात भिक्षा मागताना ही माणसं अगोदर घरांचा अंदाज घेत असत. कोणत्या घरात अशुभ घटना घडली, काही अडी - अडचणी निर्माण झाल्यात यांचा मागोवा काढून भाकीत, भविष्यवाणी वर्तवून मसनवाट्यात काही विधी करावा लागेल, असे सांगून कोंबडं, शिधा, पैसा अडका उकळत असत. अंधश्रध्देचा पगडा बसलेली ही गावगाड्यातली मंडळी फसली जात. ते सांगाल तसे हे लोक वागत असत. दिवस कलल्यावर पालावरच्या चुली डणाणत असायच्या, खांद्यावरील झोळ्या रिकाम्या व्हायचा, एक दोन कोंबडी मिळालेली असायची. गावाबाहेर एखाद्या गावठी गुत्ता असायचा अन पेहराव उतरून ही त्यांच्याकडं बसायची, बोर पावशेर मारून होलकांडत पालावर यायची, काही वेळा यांच्यात भांडणं - तंडे व्हायचे अन सांगावा गाव पाटलांपर्यत पोचायचा.

कोणत्यांना कोणत्या कारणावरून ही भांडणं जुंपलेली असायची. दारूचा अंमल जोर धरायचा, बायामाणसांना कधी कधी बेदत मारहाण झालेली असायची. पोरं भेदरून जायची, भांड्या- कुंड्याची आदळ आपट व्हायची. पालावर गलका व्हायचा अन गायरानाला जतरचं स्वरूप आल्यासारखं वाटायचं, गावपाटील दोन - चार माणसं घेऊन गायरान गाठायचा. पाटलांना पालाकडं येताना पाहून चाललेला गलका चिडीचूप होऊन कावरा - बावरा व्हायचा. त्यातला शहाणासुरता पुढं होऊन आदमीनं रामराम घालायचा अन खाली मान खालून बसायचा, पाटील काय निर्णय घेणार यावर सर्व काही अवलंबून असायचं. पोटाची खळगी भरायला आलेल्या गावात पालावरची माणसं अशी वागायची, पाटील मिशीवर पीळ देत हातात धोतराचा सोगा पकडून चौकशी करायचे. बाया - बापड्या पदर घेऊन पालाआडून पहायच्या, गडी माणसं हात जोडून ‘असं पुन्यांदा न्हाय व्हणार सरकार, एक डाव माफ करा’ म्हणून गयावया करायचे, सडजड दम देऊन निट वागा म्हणून पाटील मागारी फिरायचे.

आठ - धा दिस पालावरचं जग गजबजून असायचं, गाढवं एखाद दुसरी गाय, गायरानात खुरव्या गवतावर चरायची, परकर पोलक्यातली पोरी लाकूड फाटा गोळा करण्यात गर्क असायच्या. नंदीबैल दिवस उगवताच सजून तयार, अंगावर रंगीबेरंगी झूल, कपाळावर बाशिंग, शिंगाला शेंठ्या गोंडे, भली मोठी शिंग स्वारी डुलत -डुलत महादेवाच्या देवळाला प्रदिक्षणा घालून दारोदार ‘यंदा पाऊस पडल का’ अस म्हणताच मान डोलवायच, हलगीच्या तालावर मराठी सिनेमातली गाणी सनईच्या सुरात सुर मिसळायची, बाया नंदीबैलाच्या पायावर पाणी घालून हळदं - कुंकू वहायचं अन दर्शन घ्यायचं, झोळीत धान्य ओतायचं. नंदीवाले नंदीबैलाचा खेळ दाखवायचे.

आठ - धा दिसात एक बिर्‍हाड या गावावरून दुसर्‍या गावाकडं निघायचं, पुन्हा नवं गावं, नवी नदी, नवी माणसं, नवा मसनवाटा, नवं गायरान पालं उठल्यावर मागं उरायच्या त्या त्यांच्या आठवांच्या खुणा पालात मांडलेल्या काळ्याढिक्कर पडलेल्या तीन दगडांच्या चुली, याच चुलीवर गावाचं शिजवून पोटात भरलेल्या अन्नांचा तृप्तीचा ढेकर देत नवा गाव शोधत भटकंती सुरूच राहयची.

- प्रकाश बनसोडे, 9922685144

  • एकदिवसीय क्रिकेट सामन्याचे 25 ऑक्‍टोबर रोजी आयोजन

khedtimes.today |
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले असून हा सामना बुधवार, दि. 25 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने पुण्यातील क्रिकेटप्रेमींना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचा आनंद लुटता येणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा तिसरा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना असून याआधी या स्टेडियमवर भारताचे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध एकदिवसीय सामने रंगले होते.
न्यूझीलंड क्रिकेट संघ याआधी केवळ दोनदा पुणे शहरामध्ये एकदिवसीय क्रिकेट सामना खेळण्यास आला होता. 1995-96 मध्ये झालेल्या न्यूझिलंड आणि भारत या दोन देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील एक सामना पुण्यामध्ये झाला होता. या सामन्यामध्ये भारताने पाहूण्या न्यूझिलंड संघाला पाच गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर 8 वर्षांनी “ट्रान्स-टास्मानियन क्‍लासिक कॉन्टेस्ट’ मध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान एकदिवसीय सामना खेळला गेला होता आणि उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड संघावर केवळ एक गडी राखून निसटता विजय मिळवला होता. मात्र हे दोन्ही एकदिवसीय क्रिकेट सामने पुण्यातील नेहरू स्टेडियम मैदानावर खेळवण्यात आले होते.

पुण्यामध्ये होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन आता गहूंजे येथील एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होते. याच वर्षी 23 फेब्रुवारी 2017 रोजी एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. हा पुण्यातील पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता आणि त्यामुळे तो ऐतिहासिक ठरला होता. एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. न्यूझीलंडचा एकदिवसीय क्रिकेट संघ पहिल्यांदाच एमसीए स्टेडियमवर जागतिक एकदिवसीय क्रमांकावर अव्वल स्थानावर असणाऱ्या भारतीय संघाशी दोन हात करणार आहे.

एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर याआधी झालेल्या दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाने संमिश्र कामगिरी केली आहे. 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर या वर्षी 15 जानेवारी 2017 रोजी इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने सनसनाटी विजय मिळवला.

या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि स्थानिक खेळाडू केदार जाधव यांनी धडाकेबाज शतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. “हाऊसफुल्ल’ झालेल्या या सामन्यात विराट आणि केदार यांच्या खेळीने उपस्थितांना अविस्मरणीय अनुभव मिळवून दिला होता. भारतीय दौऱ्यावर येणारा न्यूझीड संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार असून हे सामने पुण्यासह मुंबई आणि कानपुर येथे होणार आहेत. केन विल्यमसन कर्णधार असलेला न्यूझीड संघ भारत दौऱ्यात तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळणार असून हे सामने दिल्ली, राजकोट आणि तिरूअनंतपूरम येथे होणार आहेत.

भारत-न्यूझीलंड सामन्याची तिकीटविक्री आजपासून
भारत न न्यूझीलंड यांच्यातील आगामी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या अधिकृत तिकीटविक्रीला महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आजपासून सकाळी 10ः00 वाजता प्रारंभ करणार आहे. क्रिकेटप्रेमींना दोनप्रकारे तिकिटे विकत घेता येतील अशी सुविधा एमसीएने केली आहे. यात ऑनलाईन पर्याय असेल. त्यासाठी “डब्लूडब्लूडब्लू डॉट बुकमायशो डॉट कॉम’ हे संकेतस्थळ आहे. याशिवाय प्रत्यक्ष तिकीटविक्री भांडारकर रोडवरील पीवायसी हिंदू जिमखाना तसेच गहुंजे येथील एमसी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अशा दोन ठिकाणी होणार आहे. या दोन्ही ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत तिकीटविक्रीचे काऊंटर सुरू राहणार आहेत.

पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी हा दिवस-रात्र (डे-नाईट) सामना एक आनंदाची पर्वणीच असेल. याआधी पुण्यामध्ये झालेला भारत-इंग्लंड एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना हाऊसफुल झाला होता आणि त्या सामन्यात भारताने विजय मिळवत उपस्थितांना अविस्मरणीय अनुभव मिळवून दिला होता. यापूर्वी 13 ऑक्‍टोबर 2013 रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील झालेला एकदिवसीय सामना हा एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. त्यामुळे तो ऐतिहासिक ठरला होता.

भारत-न्यूझीलंड सामन्याचे तिकीटविक्रीचे दर असे आहेत –
वेस्ट स्टॅंड व ईस्ट स्टॅंड – 800 रु., साऊथ अप्पर- 1100 रु., साऊथ लोअर- 2000 रु., साऊथ वेस्ट व साऊथ ईस्ट स्टॅंड- 1750 रु., नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टॅंड- 1750 रु., नॉर्थ स्टॅंड- 2000 रु., साऊथ पॅव्हेलियन ए आणि बी- 3500 रु..
कॉर्पोरेट बॉक्‍समध्ये प्रत्येकी 12 जणांसाठी आसनक्षमता आहे. त्यासाठी एका कॉर्पोरेट बॉक्‍सचे सहा लाख रुपये शुल्क आहे.

एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे- महत्वाचे टप्पे –
21 डिसेंबर 2011- महाराष्ट्र-हिमाचल प्रदेश यांच्यातील रणजी करंडक लढतीने औपचारिक उद्‌घाटन
1 एप्रिल 2012- एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे उद्‌घाटन
8 एप्रिल 2012- आयपीएल-2 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि पुणे वॉरियर्स यांच्यात सामना
20 डिसेंबरः 2012- पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामना – भारत वि. इंग्लंड
13 ऑक्‍टोबर 2013- पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना – भारत वि. ऑस्ट्रेलिया
9 नोव्हेंबर 2015- बीसीसीआयकडून स्टेडियमला कसोटी दर्जा
24 फेब्रुवारी 2016- पहिला रणजी करंडक अंतिम सामना
9 फेब्रुवारी 2016- दुसरा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामना – भारत वि.श्रीलंका
15 जानेवारी 2017- दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना – भारत वि. इंग्लंड
23 फेब्रुवारी 2017- पुण्यातील पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना – भारत वि. ऑस्ट्रेलिया.