khedtimes.today |
सुगीचा हंगाम संपत आला. खळ्याभोवती सांडलेले, वावडीवरून उधळलेलं मातरं गोळ्या झालं. गडी माणसं थोडी निवांत झाली, परंतु बाया-बापड्यांना अजून उसंत नव्हती. नदीवर खळाळत्या पाण्यात, डोहात मातरं धुवायचं काम चालू झालं, अनेक प्रकारचं धान्य मातीत एकत्र झालेलं, दुरडीत भरून ते पाण्यात खंगाळलं की काळी माती पाण्यात विरघळून जायची, लहानसहान खडे मात्र तसेच राहयचे, चवाळ, बारदानावर ते वाळत घालायचे. दिवसभर बाया नदीत मातरं धुवायच्या. लहान-सान पोरं पोरी नदीत डुंबायची. नदीचा प्रवाह गळासारखा वहायचा. बुडकीचा डोह, हजरत बाबाचा डोह, म्हसुबाचा डोह, खटकळी या सा-या डोहावर मातरं धुवायची घाई चाललेली असायची. उन्हाचा पारा लागला की म्हशी डोहात घुसायच्या, जनावरं मात-याला तोंड लावायची, कुत्र्यांच्या कळवडीनं वाळत घातलेलं मातरं विस्कटलं की बाया शिव्या हासाडायच्या, राखोळ्याच्या कुळीचा उद्धार करून मोकळ्या व्हायच्या.

उन्हाचा कडाका जस जसा तापायचा तस तसं मातरं वाळायचं, वा-याची झुळूक मंद व्हायची, झाडाझुडपाची सळ-सळ थांबायची, पाण्यात असून अंगाला घाम फुटायचा. पाखरं शांत झालेली, भर उन्हात मात्र घार आकाशात झेप घेत होती. एखाद दुसरी टिटवी पण मध्येच टिवटिवत उडायची. नदीच्या डोहाच्या कडेला बगळे एका पायावर तासन्-तास उभी ठाकलेली होती, अलगद एखाद मासा पटकन गिळायची. दिस कलताच उन्हं उतरणीला लागताच मात-याची गाठोडे बांधून बाया गाववाटाला लागयच्या.

भल्या पहाटे महारवाड्यात हलगी कडाडू लागली. तस-तस गाव जागा होत होता. हलगीचा आवाज घुमू लागला अन आळीचे कान टवकारले. आवसगावची पोतराज मंडळी गावात दाखलं झालेली. रातीच वस्तीला किसनाच्या घरी महारवाड्यात उतरलेले. परसु पोतराज अन सोबती सोनबा होताच, अंगोळ आटोपून सोनबानं आपल्या साहित्याचं गोठोडे सोडलं अन त्यातलं एक साहित्य बाहेर काढून व्यवस्थितपणे मांडणी केली. तोपर्यत किसनाच्या बायकोनं रखमानं चुल पेटवली अन् चहा टाकला. दोन जरमलाच्या परातीत चहा दिला, रखमाला त्यांनी चहा घेऊन परती हवाली केल्या. गाठोड्यातून, डब्यातल्या वस्तूमधून हळद, कुंकू, तेलाची बाटली, फणी, आरसा, गंध असं समोर मांडून प्रथम केसाला तेल लावलं, फणीनं विचरून केस मोकळे सोडलं. कपाळवर पिवळं पट्ट काढून त्यावर हळदी कुंकवाचा मळवट भरला. अंगात सदरा घालून बाह्या कोपरापर्यत धूमडून घेतल्या. कमरेला एक-एक चोळाचा खण, झंपर, पिसांचा घेर सुटसुटीत बांधून घेतला, यालाच ‘आभ्राण’ असे म्हणतात.

अधून मधून सोनबा हलगी पेटलेल्या चुलीपुढं धरून शेकत होता, जेणेकरून हलगीचा आवाज टंग..टंग वाजावा, हातातल्या टिप-याने तो पुन्हा पुन्हा टिपरू टाकून बघायचा. परसु साज चढवण्यात दंग होता. महारवाड्यात, मांगवाड्यात लक्ष्मी आई, मरीआईचं देवळं असायची. कुठे निवारा असायची तर कुठे उघडी बोडकी देवळे असायची. निवारा असलाच तर तो ही पत्रावजा एकांद लहानसं शेडवजा असायचे. गावातल्या विशेष करून म्हार-मांग वाडातल्या बायांच्या अंगात या देवी यायच्या व त्याच या मंदीराच्या ख-या पुजारी असतं. देवळाची देखभाल ही त्या समाजाची मक्तेदारीच असे. समाबाय, कलूबाय या गावातल्या नामांकित आराधीनी होत्या. मंगळवार, शुक्रवारी नित्यनेमानं ह्या दोघी शेणानं देवळं सारवायच्या.

दिस उगवून वर आला आन परसु साज चढवून तयार झाला. देवीचं दर्शन घेऊन हलगी कडाडली अन परसुनं ताल धरला. सोनबाचं टिपरू हालगीवर जोर धरू लागलं, गावातल्या आया-बाया मरीआयच्या देवळासमोर जमू लागल्या की, पोरं सोर गर्दी करू लागली. गळ्यात कवड्याच्या माळा, हिरव्या बांगड्यांची माळ, गळ्यात आसूडागत पोत या पोताचं टोक शेदरानं लाल केललं, नारळ्याच्या आकाराचं तर बाकी निमळूता आकार होता. ‘लक्ष्मी आयचं चांगभलं, मरीमातेचं चांगभलं’, अशी आरोळी ठोकून पुन्हा हलगी कडाडली अन परसुच्या पायांनी ताल धरला. पायातल्या घुंगरांचा मंजूळ आवाज हलगीच्या सुरात सुर मिसळाचा. केस मोकळे सोडून गोल फिरकी घेत फिरायचा. गाया-म्हातारी, गडी माणसांनी देवळाच्या समोर गर्दी केली तर काहींनी पाण्याचा तांब्या, सुपात दाणं, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, डाळ, दाणं सुपात आणून मांडलं. मात्र यात हळदी कुंकवाचा करंडा हमखास असायचा. बाया पोतराजाच्या पायावर पाणी घालायच्या, हळदी कुंकू लावून डोईवर पदर घेऊन मनोभावे दर्शन घ्यायच्या. पोतराजही बायामाणसांच्या कपाळाला हळदी कुंकू लाऊन ‘येल मांडवाला जाऊ दे, लक्ष्मी आय सुखात ठेव, असा आशिर्वाद द्यायचे.

सोनबानं हलगीचा आवाज वाढवला, आता गाण्याला सुरूवात होणार होती. रामायण, महाभारत, रामसितेचा वनवास, श्रावणबाळाची कहाणी, राजा दशरथानं केलेला श्रावणबाळाचा वध या सा-या कहाण्या परसू आपल्या गोड आवाजात पोतराजाच्या रचलेल्या गाण्यातून लोकांसमोर मांडायचा.
‘नगर, बिदर शेगाववाल्या,
जमल्या सा-या जणी.
आष्टी, पाटोदा, जामखेड, बीडच्या,
जमल्या - जमल्या सवासणी.’
गीताला सुरूवात व्हायची, बाया तल्लीन होऊन गाणी ऐकायच्या.
‘कैकयीच्या हट्टापायी
राजा राम झाला दास,
परटाच्या घुगलीने
सीता भोगी वनवास.’
बाया भान विसरून जायच्या, डोळ्याला पदर लावायच्या. दिस बराच वर आलेला असायचा, चार आठ दिसात गाव मागून व्हायचा. पोतावर पाजळायला दिलेलं तेल जमायचं, पैशाची चिल्लर खुळखुळायची, दुपारनंतर पोतराजाचा खेळ संपायचा. नाचून- नाचून हात-पाय ठसठसायचं, तिन्ही सांजला मरीआयच्या मंदीरात दिवा पेटायचा, राती कुणाच्या तरी घरी आराध्याच्या बैठका व्हायच्या, कोंबड्याच्या रस्याच्या पराती वरपून पोतराज मंडळी दोन चार दिसातला मुक्काम संपवून दुसरं गाव गाठायचे.

- प्रकाश बनसोडे, ९९२२६८५१४४

khedtimes.today |
राजगुरूनगर : ग्रामीण भागातील विद्यार्थी हे इंग्रजी विषयाची भीती बाळगतात. त्यांच्या वक्तृत्वाचा अभाव असतो, मात्र हे सर्व न्यूनगंड बाजूला सारून त्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन खेड उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे यांनी केले. गरूडझेप पोलीस ॲकॅडमी आयोजित पोलीस भरती उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.

या वेळी द युनिक ॲकॅडमीचे देवा जाधवर, शोभना खडके, पतंजली योग समितीचे युवा प्रभारी अरविंद माकडे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. गरूडझेप ॲकॅडमीचे प्रा. आसाराम वंजारे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा दिला. याशिवाय संस्थेतील ७० पैकी २१ जणांची आर्मी व पोलीस खात्यात भरती झाल्याचे सांगितले.

प्रास्ताविक प्रा. प्रमोद कोहीनकर यांनी केले. सूत्रसंचालन संपत गारगोटे  यांनी केले. प्रा. सचिन नाईकडे यांनी आभार मानले. 

khedtimes.today |
समाजाचा चेहरा, माणूसपणाची जडण घडण ही शिक्षणांच्या पवित्र मंदिरात होत असते. पुढील पिढ्यांपेक्षा समाजातील बहुतांशी पिढ्या घडविण्याचे प्रभावी कार्य शिक्षक करतात. ज्ञानदानाचे कार्य करणा-या गुरूजनांच्या खांद्यावर समाजातील सर्वच घटक कार्यरत दिसतात. हा शिक्षक समर्थपणे आदर्श विद्यार्थी व देशाचे, राष्ट्राचे पुन:र्रउत्थान करत असतात. ही अशीच कामगिरी करणार्‍या शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्काराने ’ सन्मानित करण्यात येते. यंदाचे मानकरी आदर्श शिक्षक ‘बाबाजी शिंदे’ यांचा समाजनिर्मितीचा प्रवास ‘खेड टाइम्स’ उलगडला आहे. त्यांच्याशी शुभम वाळुंज यांनी केलेली खास बातचीत....

प्रश्‍न : या पुरस्काराचे श्रेय कोणाला द्याल?
बाबाजी शिंदे : या पुरस्काराचे खरे मानकरी विद्यार्थी आहेत. याचबरोबर आई-वडील, कुंटूबांतील सर्वच सदस्य, सहकारी शिक्षक, एकेरीमाळ व टाकळकरवाडीचे सर्व पालक व ग्रामस्थ असतील.

प्रश्‍न : या क्षेत्रात कसे व कधी आले?
 : या शिक्षणाच्या पवित्र गंगेतच आपण आयुष्यभर कार्य करण्याचा चंग बांधला होता. १९९० ला दहावी उत्तीर्ण झालो, त्यानंतर डी. एड. पूर्ण करून मी २० ऑक्टोबर १९९३ मध्ये मी पाबळ येथील एकेरीमाळच्या शाळेवर रूजू झालो. येथूनच ख-या अर्थाने माझ्या ज्ञानदानाच्या कार्याला हळूहळू गती मिळत गेली.

प्रश्‍न : शिक्षणक्षेत्रातील आजपर्यतच्या प्रवासात कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले. आणि काही बरे वाईट अनुभवाबद्दल काय सांगाल?
 : मी एकेरीमाळ शाळेवर आलो तेव्हा तिथे भौतिक सुविधाचा अगदी दुष्काळच होता. शाळची इमारत सुव्यवस्थेत नव्हती. पहिल्यांदा मग मी आपली शाळा मुलभुत सुविधायुक्त कशी करता येईल, यावर लक्ष केंद्रित केले. शासनाच्या माध्यमातून दोन वर्ग खोल्या मंजूर करून, काम पूर्ण केले. परंतु शाळेला सुरक्षा भिंत नव्हती. मग शासनाची कोणतेही मदत न घेता एकेरीमाळ ग्रामस्थांच्या श्रमदानातून आम्ही दगडी सुरक्षा भिंत बांधली आहे. अनुभवाबद्दल सांगायचे झाले तर सगळेच अनुभव चांगले मिळाले. शिष्यवृत्तीचा निकाल चांगल्याप्रकारे मिळवण्यात यश आल्याने टाकळकरवाडीच्या पालकांनी दोन वेळा सोन्याची अंगठी देऊन सन्मानित केले आहे. हाच माझ्यासाठी खरा पुरस्कार होय.

प्रश्‍न : विद्यार्थ्यासाठी कोणते अनोखे उपक्रम राबवले?
 : मी शिष्यवृत्तीसाठी खूप मोठ्या प्रमाणात अनुकूल आहे. याचे कारण या परिक्षेच्या धर्तीवर प्रशासकीय सेवेतील परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती उत्तीर्ण करणे हे माझे पहिले ध्येय असते. याशिवाय ई-लर्निगबद्दल मुलांना नेहमीच कुतूहल वाटेल असे शिक्षण देणे. विशेष म्हणजे निसर्ग कविता शिकवण्यासाठी परिसरात शेतावर जाऊन शिकवणे, खेळांच्या माध्यमातून सामान्य ज्ञान देणे यांसारखे उपक्रम यासारखे उपक्रम आजपर्यत राबवले आणि त्यात यशस्वी झालो.

प्रश्‍न : मागील काही काळात शिक्षकांची प्रतिमा मलिन होत चालली आहे, याबद्दल काय सांगाल?
 : शिक्षकांकडून अनेकदा अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येते. खरं पाहिले तर असे प्रकार घडणे, ही शोकांतिकेची गोष्ट आहे. शिक्षणाच्या पवित्र मंदिरात शिक्षकांकडून होत असलेल्या संबंधित घटनेत ती व्यक्ती दोषी असेल तर तिच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहीजे. संस्कारक्षम शिक्षकांकडून हे होणे योग्य नाही.

प्रश्‍न : आगामी वाटचाल काय असेल?
 : शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळवणे, ‘ई-लर्गिंन’चा वापर करतो आहोत; परंतु संपूर्ण शिक्षण डिजीटल देण्यासाठी प्रयत्नशील असेल. शिष्यवृत्तीचा निकाल अजून कसा वाढेल, यावर लक्ष केंद्रित करणार आहे. विद्यार्थ्यांना इंटरनेट वापरासाठी साक्षर करणार तसेच सामाजिक दृष्टीकोनातून परिपूर्ण विद्यार्थी कसा घडवता येईल, याचा अखेरपर्यत प्रयत्न राहिल.

- शुभम वाळुंज, राजगुरूनगर

khedtimes.today |
राजगुरूनगर : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीला सन २०१६ - २०१७ या आर्थिक वर्षामध्ये ४ कोटी १२ लाख ८ हजार ५१७ रूपयेचे उत्पन्न मिळाले, असल्याची माहीती बाजार सतिमीचे सचिव चांभारे यांनी दिली आहे.

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची १४ वी वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेच्या राजगुरूगनर येथील सभागृहात नुकतीच समितीचे विद्यमान सभापती नवनाथ होले यांच्या अध्यक्षतेखाली खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली. समितीच्या एकूण उत्पन्नात ४५ लाख २४ हजार ९१२ रूपयांचा वाढावा झालेला आहे, असे ही समितीचे सचिव चांभारे यांनी सांगितले आहे.

या वेळी उपसभापती विठ्ठल वनघरे, संचालक विलास कातोरे, अशोक राक्षे, चंद्रकांत इंगवले, विनायक घुमटकर, पांडुरंग बनकर, अनिल राक्षे, सुगंधाताई शिंदे, बाबाजी काळे, धारू गवारी, धैर्यशिल पानसरे, आजिज काझी, राम गोरे, सयाजी मोहिते, बाळशेठ ठाकूर, रेवणनाथ थिगळे, वैशालीताई बारणे, ज्योतीताई आरगडे, समितीचे सचिव सतीश चांभारे, माजी सभापती हिरामण सातकर, रमेश राळे, शांताराम चव्हाण, काळुराम कड, मारूती बारणे, नानासाहेब टाकळकर, केशव आरगडे, दशरथ गाडे, कैलास लिंभोरे, तान्हाजी केंदळे, पांडुरंग गोपाळे, राजाराम लोखंडे, नामदेव कलवडे आदि उपस्थित होते.

  • पणन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते वितरण

khedtimes.today |
राजगुरूनगर : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाकडून उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणारा स्व. वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार खेड (जि. पुणे) कृषी समितीला पणन सहकार मंत्री सुभाषराव देशमुख यांच्या हस्ते आणि राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या उपस्थित देण्यात आला.

पुणे येथे वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नवनाथ होले, उपसभापती विठ्ठल वनघरे संचालक चंद्रकांत इंगवले, सचिव सतीश चांभारे, सुरेखा मोहिते, सुनील थिगळे यांनी पुरस्कार स्विकारला.

राज्य बाजार समिती सहकार संघाने स्व. वसंतदादा पाटील स्मृती पुरस्काराकरिता राज्यातील बाजार समित्यांकडून केलेल्या विकास कामे व उत्पन्न खर्च वाढावा आदी बाबत प्रश्नावलीचे प्रस्ताव मागितले होते.

या पुरस्काकरीता खेड बाजार समितीची निवड झाल्याबद्दल बाजार समितीचे नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिनिधींनी बाजार समितीचे सभापती नवनाथ होले, उपसभापती विठ्ठल वनघरे, सर्व संचालक मंडळ, सचिव सतीश चांभारे, कर्मचारी यांचे ठरावाने अभिनंदन केले.

  • पंडित दिनद्याल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम

khedtimes.today |
चाकण : भारतीय जनता पार्टी, चाकण शहर व भाजपा विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त व जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून खेड तालुक्यातील भाजपा जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह व विमा संरक्षण प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री गिरीषजी बापट यांच्या हस्ते व भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संजय(बाळा) भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष क्रांती सोमवंशी, सरचिटणीस पांडुरंग ठाकूर, सचिन सदावर्ते, जिल्हा उपाध्यक्ष रामदास धनवटे, कालिदास वाडेकर, संपर्कप्रमुख संदीप सोमवंशी, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष राजन परदेशी, कायदा आघाडी जिल्हाध्यक्ष किरण झिंजुरके, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष सजिद सिकीलकर, मा. तालुकाध्यक्ष दिलीप वाळके, शहराध्यक्ष सतीश धाडगे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खराबी, विजय पवार, बाळासाहेब नाणेकर, कृष्णा कळमकर, राहूल गवारे, निलेश जोशी, शुभम वागसकर, आदित्य जगनाडे, नदीम शेख, अमोल चांदणे, प्रतिक गंभीर, निनाद धाडगे, विपुल मांडेकर, ऋषिकेश चव्हाण आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
        
यावेळी मा. पं. स. सदस्य अमृत शेवकरी, मा. शहराध्यक्ष गणपत शेवकरी, जिल्हा सरचिटणीस पांडुरंग ठाकूर, भाऊसाहेब कुटे, गुलाब खांडेभराड, सुकन्या लोखंडे, लता लोखंडे, कांताराम घुंडरे, सुदाम उकिरडे, सुर्यकांत मुंगसे, अरूण हलगे, चंद्रकांत हलगे, सुरेश सासवडे, सुर्यकांत शिंदे, उत्तम वाघोले, कान्हू डोमाळे, लक्ष्मण मांडेकर, मारूती वहिले, रामचंद्र वहिले, दत्तात्रय वाळुंज या जेष्ठ भाजपा कार्यकर्त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
          
या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा शहर उपाध्यक्ष अमोघ धाडगे व भाजपा विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस संदेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र खरमाटे, प्रास्तविक संदेश जाधव, अमोघ धाडगे यांनी केले. तर प्रविण कर्पे यांनी आभार मानले.

  • चाकणमधील सर्वात मोठ्या नवरात्र उत्सवाचे केले आयोजन

khedtimes.today |
चाकण : येथे पैलवान बॉईज, आयोजित भव्य नवरात्र उत्सव पार पडला. चाकण मधील १४ तरुणांनी एकत्र येऊन भव्य दिव्य स्वरूपात नवरात्र उत्सवाचे आयोजन केले होते.

मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली होती. तरुणांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करून नवरात्र उत्सव करण्याचे ठरवले. विशेष म्हणजे मंडळाला कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही. मंडळात कोणही अध्यक्ष नाही. सर्व आयोजक सर्व कार्येकर्ते मंडळाचे अध्यक्ष आहेत. कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता कार्यक्रम यशस्वी करण्यात या युवकांना यश मिळाले आहे.

कार्यक्रमाचे खास आकर्षण ऋता दुर्गुले (फुलपाखरू), नुपूर परुळेकर ( किती सांगायचंय मला), मधुरा देशपांडे (असे हे कन्यादान), मिस्टर ओलांपिया महेंद्र पगडे हे होते. दि. २६ रोजी भव्यदिव्य होम मिनिस्टरचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये ३४७ महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. मंडळाने सामाजिक भान जपत ‘झाडे लावा, झाडे जागवा’ हा सामाजिक संदेश देत महिलांना तुळशीची रोपे व इतर झाडे वाटप केली. तसेच डान्सस्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. डान्स स्पर्धेला मोठया प्रमाणात प्रेक्षकांची उपस्थिती होती.IMG 20171003 WA0005 web

‘पैलवान बॉईज’ला विशेष सहकार्य सर्व दांडिया रसिकांचे व दांडिया प्रमींचे लाभले. मंडळाला विशेष सहकार्य अशोक भुजबळ, सागर शेवकरी, सम्राट गोरे, सचिन शिवेकर, शुभम गाडगे, कैलास दुधाळे, स्टेपींन डान्स क्लास, डीजी फ्रेंडस् सर्कल यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन सिद्धार्थ भुजबळ, शुभम शेवकरी, किशोर गोरे, सुमित शेवकारी, निलेश मांडेकर, गणेश शेवकरी, शुभम जंबुकर, राकेश भुजबळ, वैभव शेवकरी, तेजस भुजबळ, अक्षय भोकरे, सचिन पिंगळे, गणेश कदम यांनी केले आहे.