khedtimes.today |
नदीचा खळाखळता प्रवाह आटून गेला. डोह, डबक्यातलं पाणी आटत होतं. माळरान बोडकं दिसू लागलं, कोवळी झाडं-झुडपं वाळून जाऊ लागली. वावरातली दसकटं वाळून गेली, वावरात वावटळी भरारू लागल्या, पाचोळा उडू लागला. वावरात माणसं दिसेनासी झाली, सुर्य आग ओकत होता. जनावरं झाडांची सावली शोधू लागले.

गायरानाच्या एका कोप-यात अजूनही दोन पालं तग धरून होती, ती कैकाडी समाजाची. त्यांच्या प्रमुख व्यवसाय कणगी, डाल, झाप, दुरड्या, सिप्तारं, गणगुली, डारलं, डुरकुलं, कुडवं ही सर्रास प्रत्येक गावगाड्याच्या घरासाठी लागणा-या वस्तु बनवणं हे असायचं. दर साली या गावात रामा कैकाडी आपलं बि-हाड घेऊन दाखल व्हायचा. रंगानं काळाकुटं असणारा हा गडी रगाट अन् रानगट होता, बायको-पोरं ही काळीच होती. तो सोबतीला एखादं बि-हाड घेऊन यायचा. गाढवावरचं बि-हाड मांडून त्याची सालभर गावोगाव भटकंती असायची.

दिवस उगवायच्या आत पालं जागी झाली. कत्या, कोयती, ईळ, च-हाट घेऊन नदी काठाला लागली. नदीच्या काठावर बेशर्मीची झाडं मायदाळ वाढलेली, अथांग पसरलेला नदीचा विस्तार भलयाच मोठा होता. खोलगट भागात पाणी साठा होता, नदीचे उथळ भाग उघडे झालेले. अंधाराला दूर सारत रामा कैकाडी एक एक पाऊल पुढं टाकत होता. नदीकाठाला भकाळ्या पडलेल्या गयपान-फुरसनं अडकलेल्या, झाडा-झुडपांच्या मुळ्या उघड्या पडलेल्या, मोकार बेशमची माजलेली, निरगुडीची दाट झाडं न्याहळली अन् जागा निश्चित करून घेतली, निरगुडीची फोक हिरवंगार झालं होती. कानाला गजमा बांधून सपासप इळं, कत्या चालू लागली. बाया-पोरं पाला साळून भारं बांधून ठेऊ लागली. लाल - पिवळ्या फुलांची चिलारी अंगभरून फुललेली, तोडून टाकलेली निरगुडी, चिल्लारीची फोकं साळून पडू लागली. तासाभरात हिरवंगार डामकं उद्धवस्थ होत होतं.

गयपान, धळ पाहून दात चालू लागले. दिवस चांगलाच वर आलेला, नदीच्या पानोट्यावर गाववाटानं जनावराचा रकुंदळ सुटलेला, जनावरं अन् बैलगाड्यांचा धुराळा उडू लागला. पांदणीची वाट जित्राबानं भरून गेली. झाडीत गारवा वाटत होता तरी हात सावधगिरीने चालत होते. झाडांच्या खोडाभोवती अनेक बीळं होती. त्यातून एखादी धामण सळसळत निघायची अन् डोळ्याची पापणी लवते न् लवते तसी सळाळत कुठंतरी गडप व्हायची.

झाडाच्या खोडात एखादं मोहळ असायचं, माशा घोंगावत सुटायच्या, त्यातल्या काही माशा चावायच्या, पोरं लांब पळून जायची अन् रामा अलगद म्हवळाचं पोळं बाहेर काढायचा. पोरं पुन्हा पळत यायची. मधमाशा कितीतरी वेळ त्याच जागेवर घोंगत रहायच्या. लेकरं मधंसाठी लाळ घाळत होती. उन्हं तापू लागली तसी मोळी डोक्यावर घेऊन बाया गायरानाच्या वाटाला लागली, जळण-लाकूड फाटा सोबतच बांधलेला.

आपल्या-आपल्या पालासमोर भारं आदळताच डोक्यावरचा भार हलका झाला अन् कपाळावरचा घाम पुसत दगडावर बुंड टेकवली. उठून गेलेल्या बि-हाडाच्या दगडाच्या चुली कामी आल्या. बाया कामाला लागल्या. चुली पेटल्या अन् पोटात कावळे ओरडू लागलं. पाच-सात वर्षाची पोरं, पराती, भगुली, तांबे घेऊन भाकरी मागण्यासाठी रवाना झाली ती गावातील प्रत्येक घराकडे.

पायकुट घातलेली गाढवं गायरानात मोकट सोडून दिलेली, रामानं फाटलेल्या कोपरीचं खिसं चाचपून बगीतलं, बगली खिशात हात घालून दोन बिड्या काढल्या; अन् उठून चुलीतल्या कोलीतावर पेटवून झुरका मारला. सोबतीच्या पावण्याला हाक मारून बीडी दिली. चुलीवर काळ्या गुळाचा चहा उकळत असलेल्या रामाच्या बायकोनं, पदरानं चुलीवरचं भगुलं उतरवलं अन् जरमलाच्या पेलात दोघांना चहा दिला. चुलीला कानोडं करून भगुलं ठेवून दिलं. हा-हा म्हणता पानोठ्यावर जातं येता कैकाड्याची पालं गायरानात उतरली ही वार्ता गावभर पसरायची.

पोरं म्हार-मांगवाडा सोडून सा-या गावभर भाकरी मागत हिंडू लागली. आया-बाया चौकशी करत कोरं- अर्धी, शिळं, पाळं झोळीत टाकत अन् लेकरं, पुढचं दार गाठीत झोळी भरल्याच्या अंदाज बांधून ही पालाकडं फिरत अनवाणी पायाला तापलेल्या मातीचं चटकं बसत, फुपाट्यानं पाय माखून जात. पण भाकरीच्या ओझ्यानं त्यांच्या चेह-यावर समाधान झळकतं होतं.

पालावर येताच सगळी एकत्र जमा होत. डोक्यावरचं कालवणाचं भाडं अन भाकरी उतरून घेऊन सारी एकत्र जेवत पोरं जेवणावर तुटून पडत. जेवणं उरकल्यानंतर निरगुडीच्या चिलारीच्या फोकाचं आता कत्तीनं मधोमध भाग चिरलं जात होतं. जसा डाग बनवायचा तसं फोक चिरलं जात होतं. दोन्ही पायाच्या मधोमध अंगठ्यांनी दाबून डागाची बांधणी केली जात होती. दुरड्या, डाली, झाप, टोपली, डारलं, डुरकुलं, कुडवं काही प्रमाणात ही नियमित वापराच्या जिन्नस आकार घेत होत्या.

लांबलचक फोक मोठ्या गणगीसाठी उपयोगी पडत. दोन, चार, सहा, आठ, दहा, बारा अशा पोत्यांची कणींग बनवावी लागत असे. काही शेतकरी तुराटीचे भारे आणून पालावर टाकत, त्या तुराट्या भिजत घालून बैलगाडीच्या साठ्याचा आकाराचा शेणखत वाहून नेण्यासाठी टोकूर बनवून घेत. घर आणि शेती उपयोगासाठी बनवलेल्या या वस्तू पारंपरिक व्यवसायाने चालत आलेल्या प्रथा परंपरा आजही महाराष्ट्राच्या गावगाडा पंरपरेमध्ये मोडताना दिसून येतात, गावोगाव भटकंती आणि भंम्रती करून.
धरती अंथराया, आभाळ पांघराया
त्या लख्य चांदण्यात, निद्रीस्त कृशकाया...
याच लेखामध्ये प्रस्तुत लेखण करताना पुन्हा पुढील लेखात उर्वरीत भाग.. खास ग्रामीण संस्कृतीच्या वाचकांसाठी गावगाडा अर्थात पालावरचं जगणं....

- प्रकाश बनसोडे, ९९२२६८५१४४

  • स्वच्छतागृहे युनिटची टाकी दुरुस्तीसह गळती रोखण्याची मागणी

khedtimes.today |
आळंदी : येथील तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्यातून लाखो रुपये खर्च करून विकसित केलेल्या स्वच्छतागृह युनिटची मैला साठवण टाकीचे गळतीने परिसरात सांडपाण्यामुळे घाणीचे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यात लगतचे शेतक-यांचे शेतात घाण सांडपाणी जात असल्याने याचा परिणाम शेतीवर झाल्याने आर्थिक नुकसानीसह महसूल विभागाने पंचनामा करून अहवाल देण्याची मागणी आळंदीत करण्यात आली आहे.

या संदर्भात आळंदी नगरपरिषदेस येथील शेतकरी रामदास घुंडरे यांनी वेळोवेळी निवेदन देऊन लक्ष वेधले. येथील पद्मावती रस्त्यालगत परिषदेचा जुना कचरा डेपो आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात कचरा देखील साठला असून सदर कचरा डेपो परिषदेने बंद केला आहे. मात्र कचऱ्याची इतरत्र विल्हेवाट न लावता जागेवरच पडून आहे. या ठिकाणाहून कचरा हलविण्यासह सदर जागेस सीमा संरक्षक भिंत बांधण्याकडे देखील दुर्लक्ष झाल्याने शेतक-यात व नागरिकांत नाराजी आहे. सर्व्हे क्रमांक १२१ मध्ये येणारा कचरा व स्वच्छता गृहातील मैला मिश्रित दुर्गंधीयुक्त घाण सांडपाणी तात्काळ बंद करण्याची तसेच स्वच्छता गृहातील मैला साठवण टाकी गळती दुरुस्तीसह देखभाल करून टाकीची पर्यायी व्यवस्था इतरत्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. आळंदी महसूल विभागाने तसेच आळंदी नगरपरिषदेने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी नुकसान बाधित शेतकरी रामदास घुंडरे यांनी केली आहे. सन २०१३ पासून या बाबतचा पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र नगरपरिषद दुर्लक्ष करीत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सर्व्हे क्रमांक १२१ मधील नुकसानीचा पंचनामा करून महसूल विभासह आळंदी नगरपरिषदेने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी घुंडरे यांनी केली आहे. परिसरातील स्वच्छता गृहे प्रभावी स्वच्छते अभावी बंद असतात. यामुळे सदर परिसरातील रहिवाशी नागरिक सर्व्हे क्रमांक १२२ परिसरात मध्ये उघड्यावर नैसर्गिक विधीस जातात असे येथील नागरिक अप्पासाहेब चिताळकर यांनी सांगितले.

आळंदी नगरपरिषदेने आळंदी हगणदारीमुक्त शहर घोषित केले असून या अंतर्गत पारितोषिकात सुमारे ३० लाख रुपयांचे पहिल्या टप्प्यातील निधी देखील स्वीकारला आहे. मात्र पुढील प्रभावी नियोजनाकडे स्वच्छता गृहे परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होताना दिसत असल्याने परिसरातून नागरिक व शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. राज्य शासनाने मंजूर केलेल्या आळंदी तीर्थक्षेत्र आराखड्यातील स्वच्छता गृहांची युनिट काही ठिकाणी विकसित न केल्याने यात्रा काळात भाविकांचे स्वच्छता गृहाचे अभावी लगतच्या ग्रामपंचायत परिसरात ताण येत आहे. आळंदी परिसरातील मोकळ्या जागेत भाविक नैसर्गिक विधी उरकतात. याकडे येत्या यात्रेपूर्वी प्रभावी नियोजन करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. आळंदी मरकळ रस्त्या लगत अजून एकही ठिकाणी आळंदीत सार्वजनिक स्वच्छता गृह नसल्याने भाविकांसह नागरिकांची गैरसोय होत आहे.

भैरवनाथ चौकात देखील पालिकेच्या मालकीचे तसेच स्वच्छता गृहासाठी राखीव जागेत बांधकाम सुरु करण्याची मागणी असताना देखील अजून कामकाज सुरु नसल्याने गैरसोय होत आहे. शेतात येणारा कचरा वेळोवेळी इतरत्र उचलून टाकावा लागत आहे. यात वेळेसह शेतीचे तसेच आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

khedtimes.today |
राजगुरूनगर : श्री सुमंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी बुद्रुक (ता.खेड) या विद्यालयातील खेळाडू पुजा बाळासाहेब काळे हीची राज्य शालेय वेटलिंफटींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित, पुणे विभागीय वेटलिंफटींग, स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे (दि.९) रोजी पार पडल्या. या स्पर्धेत पुणे नगर सोलापूर या जिल्हय़ातील खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये पिंपरी बुद्रुक च्या श्री. सुमंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळविले.

स्पर्धा १७ व १९ वयोगटात मुली व मुले, अशा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत
1) काळे पुजा बाळासाहेब ४४ कि. १९ वयोगट मुली (प्रथम क्रमांक)
2) राजगुरू विनय ५६ कि. १७ - वयोगट, (द्वितीय क्रमांक)
3) कुरणे आकाश ५० कि. १९ - वयोगट (द्वितीय क्रमांक)
वरील खेळाडूंनी विभागस्तरावर यश मिळविले.

यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे सचिव कैलासदादा ठाकूर, अध्यक्ष बाबाजी ठाकूर यांनी व विदयालयाचे प्राचार्य पी. एन कर्डीले, प्रा. शरद सोमवंशी, दत्तात्रय ठाकूर, यांनी अभिनंदन केले. खेळाडूंना विदयालयाचे क्रीडा शिक्षक दिलीप ढमाले सर यांनी मार्गदर्शन केले.

वाकी बुद्रुक : सह्याद्री वाहिनी व शरद मल्हार यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नृत्य मल्हार या स्पर्धेमध्ये वाकी बुद्रुक येथील भैरवनाथ विद्यालया च्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते विद्यालयात येऊन बक्षिसाचे वितरण करण्यात आले. बक्षीस मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे येथील सभागृहामध्ये दोन महिन्यांपूर्वी हि स्पर्धा घेण्यात आली होती. त्याच प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीवर करण्यात आले होते. या स्पर्धेत विशेष प्राविण्य गटात भैरवनाथ विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला, अशी माहिती बाळासाहेब नागवडे यांनी दिली आहे.

नृत्य मल्हार स्पर्धेचे संयोजक बाळासाहेब नागवडे तसेच जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते गुरुवार (दि.५)ऑक्टो रोजी भैरवनाथ विद्यालयात येऊन त्यांनी हे पारितोषिक वितरण केले.

या कार्यक्रमासाठी बाळासाहेब नागवडे, आरती केदारी, संदीप शिंदे, डॉ. किशु पॉल, लक्ष्मण टोपे, सुरेखा टोपे, उपसरपंच स्वाती टिपरे, शशिकला सोनवणे, सुनील टोपे, प्राचार्य व्यवहारे सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश लोखंडे यांनी केले. तर आभार अनिल धर्माधिकारी यांनी मानले.

 khedtimes.today |
कोयाळी तर्फे वाडा : खेड तालुक्यातील पश्चिम भागातील कहू-कोयाळी, साकुर्डी, चिखलगाव, माजगाव, कळमोडी, औदर, देवोशी, धामणगाव येथे महत्वाचे खरीप पीक म्हणून भात पिक समजले जाते. या भागात इंद्रायणी, खडक्या, कोलम, रायभोग या भात पिकांच्या जातीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

यंदा सर्वत्रच भरपूर प्रमाणात वरुणराजाची कृपादृष्टी झाल्यामुळे या भागात भातपिक जोमात दिसत आहे. यंदाच्या समाधानकारक पावसामुळे भात पिकाच्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल, असे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

भात पिक फुलोर्‍यात असताना पावसाची गरज असते. परतीचा मान्सून भात पिके फुलोर्‍यात असताना पडल्यामुळे भात पिके जोमात दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधान दिसत आहे.

शेलपिंपळगाव : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सुवालाल भागचंद बोरा, चिंचोशी(ता.खेड) व बाळकृष्ण तात्याबा कोळेकर, कोयाळी भानोबाची(ता.खेड) या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त ऊस उत्पादन केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या २०१६-२०१७ च्या गळीत हंगामात शेलपिंपळगाव गटातून सर्वाधिक ३७५ टन ऊस उत्पादन केल्याबद्दल सुवालाल भागचंद बोरा व भोसे गटातून सर्वाधिक ५१९ टन ऊस उत्पादन केल्याबद्दल बाळकृष्ण तात्याबा कोळेकर या खेड तालुक्यातील दोन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संत तुकाराम सांस्कृतिक भवन, कासारसाई दारुंब्रे(ता.मुळशी) येथे कारखान्याच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित कार्यक्रमात सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मा. खा. विदुरा नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मा. खा. अशोक मोहोळ, मा. आ. कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे, ज्ञानेश्वर दाभाडे, रविंद्र कलाटे, संचालक अनिल लोखंडे, ज्ञानेश नवले, कार्यकारी संचालक एस. जी.पठारे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी खुर्द : येथील उपक्रमशील शिक्षक मनोहर मोहरे यांनी इयत्ता -तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील कवी तुकाराम धांडे यांच्या रानवेडी या कवितेला परिसर भेटी दरम्यान उजाळा दिला.

नुकतीच पिंपरी खुर्द शाळेची परिसर सहल सामाजिक वनिकरण व फार्म हाऊस येथे आयोजित केली होती. मुले डोंगरावर जाताच मोहरे सरांनी रानवेडी कवितेचा संदर्भ देत मुलांना कपारी, गडदी, नदी, टेकडी, पायवाटा व गायवाटा दाखवल्या. तसेच मुलांना टणटणी, करवंदाची जाळी, बुरांडीची व सोनकीची फुले यांचीही माहीती दिली.

मुलांना प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने खूपच उल्हासित झाली होती. दरम्यान मामाचं पत्र हरवलं, प्रश्नमंजूषा, कविता गायन, गप्पा, गाणी, गोष्टी, खेळ, यामधे मुले रंगून गेली होती. त्यांनी फार्म हाऊस मधील विविध फळझाडांची तसेच फुले, पिके याविषयी मुलांना माहीती दिली. बंदीस्त शेळीपालन, मत्स्य शेती, संकरीत गायी, म्हशींचा गोठा मुलांना दाखवण्यात आले. दिवसभर मुलांनी परिसर सहलीचा आनंद लुटला.

यावेळी शिक्षिका तृप्ती क्षीरसागर देखील उपस्थित होत्या.