khedtimes.today |

पुणे : धनकवडीतील करंजी, चकली, बेसन लाडू, पोह्याचा चिवडा आदींना ऑस्ट्रेलियातून मागणी झाली असून, सुमारे १५० किलो दिवाळीचे फराळाचे खाद्यपदार्थ उद्या रविवारी विमानाने पाठविण्यात येत आहेत. आस्ट्रेलियातील आमच्या काही परिचित नागरिकांनी दिवाळीचे पदार्थ तयार करून मागितले होते. त्यामुळे तातडीने आम्ही हे पदार्थ तयार करून पाठवत आहोत. अशी माहिती संकल्प महिला गृहउद्योग या प्रकल्पाच्या संचालिका सुलोचना भोसले यांनी सांगितले.

बचत गटाचे काम करतच तिने दुकानातूनच दिवाळीचा फराळ विक्री करण्याचे तिचे स्वप्न होते. ते तिने प्रत्यक्षात आणले. आणि ना नफा - ना तोटा या तत्वावर तिने नागरिकांना दिवाळीचे फराळाचे पदार्थ विक्री करण्यास सुरुवातही केली. ही घटना आहे, धनकवडी येथील तीन हत्ती चौकातील पुणे महापालिकेच्या कोठीजवळील संकल्प महिला गृहउद्योगाची आणि त्यांच्या संचालिका सौ. सुलक्षणा भोसले यांची आहे.

भोसले यांनी धनकवडी परिसरातील नागरिकांसाठी खास दिवाळीचा मुहूर्त साधून ना नफा ना तोटा या धर्तीवर दिवाळी फराळाचे खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले आहे. त्यांच्या खारी करंजीस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या गृहउद्योगातर्फे भाजणी चकली, बेसन लाडू, शंकरपाळी, खजूर लाडू, करंजी, अनारसे, रवा लाडू, ओल्या नारळाची करंजी आदी पदार्थ कमी दारात विक्रीस ठेवण्यात आले आहेत.

धनकवडी, कात्रज, आंबेगाव, नर्हे, आंबेगाव आदी परिसरातील नागरिक हे पदार्थ खरेदी करण्यासाठी येत आहेत. यासंदर्भात बोलताना भोसले यांनी सांगितले की, अनेक महिलांना नोकरी व अन्य कामामुळे घरी दिवाळीचे खाद्यपदार्थ तयार करणे अवघड असते. त्यामुळे त्यांना खास घरी तयार केलेले फराळाचे पदार्थ दिवाळीसाठी हवे असतात. हे लक्षात घेऊन आम्ही बचतगटाच्या महिलांच्या मदतीने घरीच फराळाचे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. सध्या मशीनवरही हे पदार्थ तयार करून मिळतात. पण आम्ही नागरिकांची गरज व मागणी लक्षात ठेवून खास घरीच पदार्थ तयार केले. तसेच माझ्याकडे काम करण्यास येत असलेल्या महिलांना या माध्यमातून रोजगार मिळेल हे सुद्धा मी ठरवले. सध्या आम्ही ८-१० महिलांच्या मदतीने खाद्यपदार्थ तयार विक्री करत आहोत.

या उपक्रमास मनीषा देशमुख, चेतना तांबे, उमा गणगोटे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत आहे.

  • खेड तालुक्यात सांप्रदायिकतेची नवी मुहुर्तपेढ

khedtimes.today |

तेराव्या शतकापासून खेड तालुक्याला भागवत सांप्रदायाचा वारसा लाभला आहे. विश्वाची माऊली ज्ञानोबारायांनी पाया रचत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या काळात याचा सोन्याचा कळस झाला. हाच वारसा जपण्याचे कर्तव्य तालुक्यातील कीर्तनकार व प्रवचनकारांनी केले आहे. परंतु यात एकही महिला नव्हती. आता ह.भ.प. सुप्रियाताई साठे-ठाकूर यांच्या निमित्ताने खेड तालुक्याला ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणणारी ‘मुक्ताई’ लाभली आहे. त्या समर्थपणे ही भगवी पताका सांभाळत आहे. सुप्रियाताई यांचा आजपर्यतचा हरिनामाचा प्रवास ‘खेड टाइम्स’ने जाणून घेतला आहे. त्याच्याशी केलेली ही खास बातचीत....

प्रश्न : सांप्रदायिक क्षेत्रातील तुम्ही एक युवा महिला चेहरा आहात. राज्यभरात तुमच्याकडे आदराने पाहिले जाते. तुम्ही कशा घडलात? आजपर्यतचा प्रवास कसा होता?
सुप्रियाताई साठे-ठाकूर : माझा प्रवास खरं तर माझे आजोबा कै. ह.भ.प. हरिदास मोरे (आईचे वडील) यांच्यापासून सुरू होतो. ते फडकरी होते. आई देखील प्रवचन करते. या दोन पिढ्यांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत) यातूनच भागवत धर्माची गोडी लागत गेली. वयाच्या आठव्या वर्षी माऊलीच्या आशीर्वादाने चिंचवडच्या मोरेश्वर मंदिरात पहिले कीर्तन केले आणि हा प्रवास सुरू झाला. सध्याच्या आधुनिक युगाशी नाते सांगत मायक्रोबायोलॉजीतून बी.एस.सी. व एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. वैज्ञानिक दृष्टीकोन, अभ्यासू, चिकित्सक वृत्तीने गाथेचा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. कीर्तनसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर गोवा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान पर्यत जाण्याचा योग आला. यातूनच वारकरी सांप्रदायाची विश्वव्यापकात लक्षात येते. विण्याची अमोघ साथ, पखवाजाच्या गजरात हरीनामाचा जप करत मी घडत आले आहे.

प्रश्न : वारकरी सांप्रदायाने एक वेगळी उंची गाठली आहे. तरीही युवकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही, याबद्दल काय सांगाल? याची कारणे काय असतील?
: हो नक़्कीच, वारकरी सांप्रदाय हा विश्वव्यापक आहे. तो मानवतेचा पुरस्कारार्थी असल्याने त्याचे एक वेगळे स्थान आहे. युवकांचा प्रतिसाद चांगला आहे. परंतु त्याचे प्रमाण वाढले पाहिजे हे ही तितकेच खरे. याची कारणे जर म्हटली तर युवक ज्यांना आदर्श मानतात त्यांचे दाखले, उदाहरणे हे कीर्तनाच्या माध्यमातून दिली जात नव्हती. फक्त शिवाजी महाराज व तुकाराम महाराजांची भेट हे एकमेव उदाहरण दिले जात होते. परंतु आज यात बदल होत आहे. मुळातच पन्नाशी साठीतले कीर्तनकार असतात या संकल्पनेला फाटा देत युवा कीर्तनकाराचे प्रमाण वाढले आहे. ते आपल्या कीर्तनातून शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी अगदी आईनस्टाईन पर्यतची उदाहरणे, दाखले देत भागवत सांप्रदायाचे महत्त्व युवकांना पटवून देत आहे. भविष्यकाळात यामुळे नक्कीच बदल झालेल्या दिसून येईल.

प्रश्न : या क्षेत्रात महिला कीर्तनकार म्हणून येताना काही अडचणी आल्या असतील, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
: अडचणी आल्या हे खरे आहे. पण त्या फक्त मलाच आल्या आहेत असे नव्हे. या क्षेत्रात स्वत:ला अभ्यासू, जाणते कीर्तनकार म्हणवून घेणारे काही लोक हे अगदी ‘मुक्ताई‘ला कीर्तनकार या भूमिकेतून स्वीकारत नाही. ही शोकांतिकेची बाब आहे. त्यांच्या दृष्टीकोनातून ‘मुक्ताई’ने कीर्तनच केले नाही, त्यामुळे महिलांनी कीर्तन करणे योग्य नाही. परंतु सांप्रदायात असा कोठे लिखित नियम नाही की, महिलांनी कीर्तन करू नये. सगळ्यात मोठा हाच अडसर होता आणि आहे. वैष्णव धर्मात सर्व समसमान आहेत, कोणी उच्च-निच्च नाही. त्यामुळे आम्ही सर्वजणी प्रबोधन करतच राहू.

प्रश्न : पिंपरी बुद्रुक गावाची तालुक्यात राजकारणी गाव म्हणून ओळख आहे. या गावाला सांप्रदायिकतेकडे नेण्यासाठी काय पाऊले उचलणार आहात ?
: ‘झाले गेले गंगेसी मिळाले’ असे म्हणत आता आम्ही नव्याने सुरूवात करणार आहोत. गावात अखंड हरिनात सप्ताह होतो, परंतु लोकांची उपस्थिती कमी असते. सप्ताहाचे स्वरूप कसे बदलता येईल, याकडे लक्ष देणार आहे. गावातील विठ्ठल मंदीर जीर्ण झाले आहे त्यांचा जीर्णोध्दार करणे, तसेच गावतील युवक वर्ग हा व्यसनाधिनतेकडे जात आहे, गाव व्यसनमुक्त करत युवकांना भागवताची गोडी लागण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावात नित्यहरिपाठ सेवा सुरू करण्याचा मानस आहे. त्याचबरोबर युवक व विद्यार्थ्यासाठी भागवत धर्माचे अभ्यासवर्ग सुरू करण्याची इच्छा आहे.

प्रश्न : सांप्रदायिक क्षेत्राला व्यावसायिकतेचे स्वरूप येत चालले आहे. याबद्दल आपलं मत?
: व्यावसायिकतेचे स्वरूप येत चालले आहे, हे म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु काळ बदलतो आहे. प्रवास, सोबती असणारे मंडळी, पाठीमागे असणारे कुंटुंब या सर्वाचा विचार करत ते मानधन घेतले जाते. हे ही खरे काही लोक अवाढ्य रक्कमा सांगतात. आजकाल लोकांचा असा समज झाला की, ‘जी वस्तु महाग असते, तीच चांगली असते’ यामुळे लोकदेखील अशाच कीर्तनकारांना आमंत्रित करतात. महाराष्ट्रात असेही काही कीर्तनकार आहेत जे कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता कीर्तनसेवा करतात. तसेच काही कीर्तनकार वारकरी शिक्षणसंस्था, सामाजिक संस्था चालवतात त्यासाठी लागणारा पैसा याच माध्यमातून उपलब्ध केला जातो. काही वारकरी शिक्षणसंस्था देखील अवाढ्य रक्कमा घेतात परंतु तिथे शिकणा-या विद्यार्थ्यासाठी खर्चही तेवढ्या प्रमाणात होतो. फक्त फरक एवढाच आहे, काळानुरूप आम्ही ही बदलले पाहिजे.

प्रश्न : नाथाच्या भारूडामध्ये मनोरंजन होते, पण आज कीर्तनांमध्ये वेगळ्या प्रकारचे विनोद ऐकायला मिळतात. याकडे तुम्ही कोणत्या नजरेतून पाहता?
: नाथाच्या भारूडामध्ये एक खट्याळ, सामाजिक, सभ्य विनोदातून मनोरंजन केले जाते. परंतु कीर्तनकारांच्या सेवेत सोशल मिडीयावरील विनोद दाखले म्हणून देतात. हे देणं चुकीचे नाही पण खूपच खालच्या दर्जाचे, आपल्या वाणीतून अपशब्द यावेत हे योग्य नाही. गाथेच्या, ज्ञानेश्वरीच्या अभ्यासपूर्ण विवेचनातून सामाजिक लोकजीवनाचे निरीक्षण करून त्याचे दाखले देत कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी सेवा केली पाहिजे असे मला वाटते.

  • दोन शब्द नव्या पिढीसाठी....

वारकरी सांप्रदायाचे पाईक होणे ही काळाची गरज आहे. ढासळती मानसिकता व वाढती भोगवादी, चंगळवादी वृत्तीपासून दूर राहा. हरिनाम, विठ्ठलांच्या सान्निध्यात तुम्हाला मनस्वी समाधान लाभेल, त्याकरिता हरिनामाचा जप करा. व्यसन करू नका. छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे विचार आत्मसात करा आणि राष्ट्राची नवनिर्मिती करा.

- शुभम वाळुंज, राजगुरूनगर

khedtimes.today |
टाकळकरवाडी : ग्रामीण भागातील माणसांचे नाते हे शेती मातीशी घट्ट असते. निसर्गाच्या सहवासातून ग्रामीण साहित्य निर्माण होते. दिवसेंन दिवस मराठी साहित्यांकडे वाचकवर्ग वळू लागला आहे, असे मत कवी प्रकाश बनसोडे यांनी व्यक्त केले. माजी राष्ट्रपती ऐ.पी.जे. अब्दुल कलाम यांची जंयती टाकळकरवाडी (ता.खेड) येथील ज्ञानेश्वर टाकळकर विद्यालयात साजरी करण्यात आली. हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.

डॉ ऐ.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती विविध शाळांनी ग्रंथ दिंडी, प्रभात फेरी, पुस्तक वाचन, व्याख्यान, पुस्तक परिचय, लेखक कवी आपल्या भेटीला इत्यादी कार्यक्रम करण्यात आले. विद्यार्थांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. चांगले वाचले म्हणजे चांगले बोलता येईल, असे मत विद्यालयांचे मुख्याध्यापक दतात्रय मांजरे यांनी मांडले.

वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथालय प्रमुख अनिता गुंजाळ यांनी सर्व विद्यार्थांना वाचनासाठी पुस्तके दिली होती. निवडक मुलांनी वाचन केले. या कार्यक्रमांस कवी प्रकाश बनसोडे यांनी आई, आभाळ मन या पुस्तकांतील कवितांचे वाचन केले. या कार्यक्रमांस संस्थचे अध्यक्ष कैलास टाकळकर, मुख्याध्यापक दतात्रय मांजरे, राजेंद्र काकडे, अनिता गुंजाळ, छाया राक्षे, भरत मंडले, बाबाजी वाडेकर उपस्थित होते.

गणेश राजगुरू यांनी सुत्रसंचालन केले तर आभार आनंदा ढोरे यांनी मानले.

नागपूर : दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण व सुत्रधारी कंपन्यांतील सुमारे ७७ हजार कर्मचार्‍यांना १३,५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. तसेच कंत्राटी कामगारांना ७,५०० रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.

नागपूर येथील बिजली नगर येथे ऊर्जामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सानुग्रह अनुदानाबाबत बैठक झाली. बैठकीला तिनही कंपन्यांचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सर्वश्री सचिन ढोले, विनोद बोंन्द्रे आणि सुरज वाघमारे यांचेसह वरिष्ठ अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ऊर्जामंत्र्यांनी सानुग्रह अनुदानाबाबतची घोषणा केली. ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळें वीज कर्मचा-यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

khedtimes.today |
पुणे : दैनंदिन धकाधकीच्या जीवनात अंड्याचा आहारात समावेश असणे खूप आवश्यक आहे. अंडयांचा आहारात समावेश केल्यास आपण बऱ्याच आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो. यासाठी अंड्याविषयी जनजागृती, व्यापक प्रसिद्धी आवश्यक आहे. अंड्याचे महत्व शेतकऱ्यांना समजल्यास शेती व्यवसायाला पूरक असा कुक्कुटपालन व्यवसाय वाढेल. या व्यवसायाकडे युवकांनी गांभीर्यानी पाहिल्यास युवक उद्योजक म्हणून पुढे येऊ शकतात, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.

जागतिक अंडी दिनानिमित्त मानवी आहारातील अंडयाचे पोषणमूल्य नागरिकांपर्यत पोहोचविणे, कुक्कूट पालन व्यवसायास चालना मिळावी व ग्रामीण भागात रोजगार निमिर्तीस चालना मिळावी यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालय यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात ते बोलत होते.

आरोग्याच्या दृष्टीने अंड्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. आजच्या काळात महिलांची शारीरिक स्थिती अवघड आहे. यासाठी महिलांनी दैनंदिन आहारात अंड्याचा समावेश करावा. अंडी उत्पादन घराघरांत व्हावे याकरिता शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची अंमलबजावणी झाली तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही. एक सजग नागरिक म्हणून युवकांनी या मोहिमेचा प्रसार करावा अशी अपेक्षा पालकमंत्री मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तालुका समन्वयक शिल्पा ब्राह्मणे यांनी शिरूर तालुक्यातील स्वयंसहायता बचत महिला बचत गटामार्फत सुरु असलेल्या अंडी उत्पादन व्यवसायाच्या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल माहिती दिली. आहारतज्ञ् डॉ. गीता धर्मती यांनी आहारातील अंड्याचे महत्व त्यातील महत्वाचे घटक याविषयी माहिती दिली. तसेच अंड्याविषयी असणारे गैरसमज याबद्दल शंकानिरसन केले. यावेळी उपस्थितांना उकडलेली अंडी वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केले. सूत्रसंचालन आशिष जरद यांनी केले. आभार अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण यांनी मानले.

यावेळी केंद्रीय कुक्कुट अनुसंधान केंद्राच्या निर्देशक भारती सिंह, कृषी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव विकास देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, मार्केट यार्ड कमिटीचे चेअरमन दिलीप खैरे, सहआयुक्त डॉ. गजानन राणे, वेंकीज इंडियाचे व्यवस्थापक विजय तिजारे विद्यार्थी, नागरिक, तसेच विविध विभागातील अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

विचाराकडून विवेकाकडे घेऊन जाणारा उपक्रम
khedtimes.today |
राजगुरूनगर : हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करताना वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसारासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये उत्तमोत्तम साहित्याची आवड निर्माण होऊन त्यांनी अभिरूचीपूर्ण वाचन करावे या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये मला भावलेले पुस्तक या विषयावर निबंधस्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, आवडत्या उताऱ्याचे वाचन, साहित्यिक प्रश्नमंजूषा, ग्रंथपरिचय, विविध वर्तमानपत्रातील अग्रलेखांचे वाचन इ. उपक्रम राबविण्यात आले. या निमित्ताने मराठी विभागात विचाराकडून विवेकाकडे घेऊन जाणारा डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम वाचन कट्टा सुरू करण्यात आला. त्याचे उदघाटन प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, डॉ. बी. डी.अनुसे, दिलीप मुळूक, प्रा. मच्छिंद्र मुळूक, प्रा. गणेश धुमाळ आणि प्रा. श्वेतांबरी आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व उपक्रमांमध्ये कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 'मला भावलेले पुस्तक' या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक राहूल राजेंद्र सरोदे (मन में है विश्वास), द्वितीय क्रमांक दिगंबर नामदेव गायकवाड (फकिरा), तृतीय क्रमांक अभिजित रामदास ढेरंगे (पांगिरा) यांचा तर उत्तेजनार्थ बक्षीस वैष्णवी बाळासाहेब आरूडे (श्यामची आई) या विद्यार्थिनीला मिळाले.

हस्ताक्षर स्पर्धेत दिक्षा माने, स्नेहल जाधव व योगिनी पवार यांचा अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक आला. काव्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक योगिनी पवार, द्वितीय क्रमांक पायल बोरकर व तृतीय क्रमांक वैष्णवी आरूडे यांनी पटकाविला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या निवडक कवितांचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. तसेच त्यांच्या साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. याशिवाय आवडत्या पुस्तकावर मनोगत, वृत्तपत्रातील अग्रलेखांचे वाचन, साहित्यिक प्रश्नमंजूषा अशा विविध उपक्रमात निखील बोरकर, हरिप्रसाद खळदकर, गौरी जोशी, बबन होले, जयहिंद मसाडे, निखील भोगाडे, शुभम वाडेकर, शुभम शिनगारे, ओंकार होले, रोहित तळेकर, मयूर मोरे, प्रतीक्षा पवळे, प्रज्ञा थोरात या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

पारितोषिक विजेते व सहभागी अशा सर्व विद्यार्थ्यांना मराठी विभागाच्या वतीने साधना साप्ताहिकाचा युवा दिवाळी अंक तसेच विविध वर्तमानपत्रांचे दिवाळी अंक व प्रमाणपत्र प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील म्हणाले की, वाचन संस्काराची व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वाची भूमिका असते. वाचनाने मनावर, विचारांवर परिणाम होत असतो आणि पर्यायाने त्याचे रूपांतर कृतीत होत असते. मनात जीवनाविषयी सकारात्मक विचार जागते ठेवण्यासाठी वाचन फायद्याचे असते. वाचनाने माणूस प्रेरित होतो. यासंबंधी त्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांचे उदाहरण देऊन त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो असे सांगितले.

उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय शिंदे यांनी वाचनसंस्कृतीच्या प्रसारासाठी मराठी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. वाचन कट्टयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लेखन कौशल्य वृध्दिंगत करण्यात येणार असल्याचे सांगितले. वाचनसंस्कृतीचे महत्त्व सांगताना त्यांनी वाचनाने केवळ मनोरंजनच होत नसून युवा शक्तीच्या जाणिवांच्या कक्षा रूंदवतात व त्यांच्या दृष्टिकोनाला वेगवेगळे आयाम मिळतात. वाचनामुळे विद्यार्थ्यांना भूत-वर्तमान-भविष्य अशा पध्दतीने काळाच्या संदर्भात विचार करता येतो. व्यक्ती - समाज - व्यवस्था यांच्यातील अंतर्गत ताणेबाणे लक्षात येतात यासाठी वाचनसंस्कार जोपासायला हवा असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने एकमेकांना पुस्तके भेट देण्याचा, दिवाळीच्या सुट्टीत किमान ५ अवांतर पुस्तके वाचून त्यासंदर्भात लेखन करण्याचा संकल्प केला.

  • विचाराकडून विवेकाकडे घेऊन जाणारा उपक्रम

शेलपिंपळगाव : वडगाव घेनंद(ता.खेड) येथे गावात भारत गॅसची वितरण सुविधा सुरु करण्यात आली आहे.

वडगांव घेनंद येथे भारत गॅसचे १०० पेक्षा जास्त ग्राहक असूनही गेली अनेक वर्षे वडगाव घेनंद मधील ग्राहकांना गॅस रिफिलिंगसाठी अनेक वर्षे आळंदी व धानोरे येथे अर्धा अर्धा दिवस वाया घालवून ८ ते १० किलोमीटर प्रवास करून गॅस सिलेंडर रिफिलिंग करून आणावा लागत होता. गावातील गॅस ग्राहकांची ही गैरसोय लक्षात घेवून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे खेड तालुका संघटक सिताराम बवले यांनी आळंदी येथील भारत गॅस एजन्सीकडे वडगाव घेनंद येथे आठवड्यातुन किमान दोन वेळा तरी गाडी पाठवून वितरण करण्याची मागणी केली. भारत गॅस एजन्सीने गेल्या सहा महिन्यापासून आठवड्यातुन गुरुवार व रविवारी सकाळी ८ वाजता अशी दोन वेळा नियमितपणे गॅसची वितरण व्यवस्था सुरु केली आहे.

पूर्वी सिलेंडरसाठी वडगांव घेनंद ते आळंदी व नंतर धानोरे असा ८ ते १० किलोमीटरचा प्रवास करून जावे लागायचे. या कामासाठी वेळ व पैसे दोन्ही खर्च व्हायचे. भारत गॅसचे ग्राहकगाडी चालु झाल्यानंतर वेळेची, पैशाची बचत होत झाली आहे, अशी प्रतिक्रिया राहुल बवले व सुधिर बवले यांनी दिली.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे खेड तालुका संघटक सिताराम बवले यांच्या पाठपुराव्यामुळे गॅस वितरणाची गावात व्यवस्था झाल्यामुळे उपसरपंच मारुती बवले यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.