khedtimes.today |
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या पहिल्याच अधिकृत परदेश दौऱ्यासाठी आफ्रिका खंडातील दोन देशांची निवड केली. त्यातील एका देशाचे नावही मूठभरांनाच माहीत आहे. तथापि, या दौऱ्याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून, व्यूहात्मकदृष्ट्या भारताला ते फलदायी ठरणार आहे. आफ्रिकेतील देशांमध्ये चीनचा सक्रिय हस्तक्षेप आहे आणि चीनचे तेथील प्रभुत्व कमी करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक क्षेत्रात भारताला ही पोकळी भरून काढता येणे शक्‍य असून, तेथील सरकारी यंत्रणा आणि उद्योग क्षेत्रात भारताला अधिक सक्रिय राहावे लागणार आहे.

आपल्या पहिल्या अधिकृत परदेशी दौऱ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जेव्हा आफ्रिकेतील जिबूती आणि इथिओपिया या देशांची निवड केली, तेव्हा आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीशी संबंधित अनेकांच्या भुवया उंचावल्या. या निर्णयामुळे चीन गोंधळून गेलाच; शिवाय आपल्या देशातही अनेकांना हा निर्णय अपेक्षित नव्हता. भूगोल, राजकारण, माध्यम आणि परदेश व्यवहार या विषयांशी संबंधित असणाऱ्यांखेरीज अनेकांनी जिबूती या देशाचे नावही कधी ऐकले नव्हते आणि तोच देश राष्ट्रपतींनी पहिल्या भेटीसाठी निवडला. राष्ट्रपती झाल्यानंतरचा हा पहिला दौरा केवळ योगायोग नव्हता तर अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता, असे कोविंद यांनी स्वतःच सांगितले. जिबूती हा देश आकाराने खूप छोटा, लोकसंख्येचा विचार करता आणखीच छोटा; परंतु लष्करीदृष्ट्या तितकाच महत्त्वपूर्ण देश आहे. उत्तरेला इरिट्रिया, पश्‍चिम आणि दक्षिणेला इथिओपिया आणि दक्षिणेला सोमालिया या जिबूतीच्या चतुःसीमा आहेत. सागरी सीमांच्या दृष्टीने हा देश लाल समुद्र आणि अदनच्या उपसागराने वेढलेला देश आहे. केवळ 23 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या देशाची लोकसंख्या अवघी पाच लाखांहून थोडी अधिक आहे. म्हणजेच, आपल्याकडील महानगरे सोडाच; एखाद्या जिल्ह्याच्या लोकसंख्येपेक्षाही थोडी कमीच! या लोकसंख्येचाही एकपंचमांश हिस्सा आंतरराष्ट्रीय स्तरावर दारिद्रयरेषेसाठी निर्धारित केलेल्या सव्वा डॉलर प्रतिदिन एवढ्या उत्पन्नापेक्षाही कमी उत्पन्न असलेला आहे. तरीही राष्ट्रपतींनी पहिल्या दौऱ्यासाठी याच देशाची निवड करण्यामागे खास कारण आहे.

लष्करीदृष्ट्या अत्यंत मोक्‍याच्या ठिकाणी जिबूती हा देश वसलेला आहे. हिंदी महासागरातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा देश म्हणून तो उदयास येत आहे. त्याचे भौगोलिक स्थान हेच याचे कारण होय. चीनचा देशाबाहेरील पहिला लष्करी तळ येथेच आहे आणि त्यामुळेच जिबूतीच्या नौदल तळाने जगभरातील देशांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्याची संधी दिली आहे. चीनच्या विस्तारवादी परराष्ट्र धोरणाचा एक प्रमुख भाग म्हणून या नौदल तळाकडे पाहिले जाते. आफ्रिकेत चीनच्या वाढत असलेल्या लष्करी ताकदीचे हे प्रतीक मानले जाते. भारत आता तेथे सक्रिय होण्याचा प्रयत्न करीत आहे. 2015 मध्ये येमेनमध्ये उद्‌भवलेल्या संकटावेळी “ऑपरेशन राहत’च्या माध्यमातून भारत आणि अन्य देशांतील नागरिकांची सुटका करण्याच्या भारताच्या प्रयत्नात जिबूतीने भारताला सहकार्य केले होते आणि आपली धावपट्टी वापरू देण्याचाही प्रस्ताव जिबूतीने भारताला दिला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, राष्ट्रपतींच्या पहिल्या दौऱ्यासाठी जिबूतीची केलेली निवड भारताच्या दृष्टीने आफ्रिका खंडाचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. मोदी सरकार भारताच्या हितसंबंधांच्या दृष्टीने आफ्रिकेकडे पाहत आहे आणि तेथे सक्रिय राहण्यास उत्सुक आहे. आफ्रिका हा असा खंड आहे, ज्याच्याशी भारताच्या संबंधांना ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे आणि आज या खंडावर अस्तित्व दर्शविण्यासाठी जगातील अनेक देश प्रयत्नशील आहेत. भारताच्या कोणत्याही सरकारच्या प्रमुखाची किंवा राष्ट्रप्रमुखाची जिबूतीला दिलेली ही पहिली भेट ठरली आहे. या देशातील अनेक कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपती सहभागी झाले. तेथील पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याशी भेटीगाठी झाल्या आणि उभयपक्षी महत्त्वाच्या विषयांवर चर्चाही झाली. भारत आणि जिबूती यांच्या परराष्ट्र मंत्रालयांमध्ये कायमस्वरूपी संवाद साधण्यासाठीचा आकृतिबंध तयार करणाऱ्या करारावर दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या. दहशतवाद, अपारंपरिक ऊर्जा, विशेषतः आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा कराराचे सदस्यत्व, त्यासाठी जिबूतीचे सहकार्य, भारतीय उपखंड क्षेत्रात सागरी सहकार्य तसेच जिबूतीमधील युवकांना रोजगारसंधी मिळवून देण्याच्या दृष्टीने भारताकडून सहकार्य आणि तंत्रज्ञान हे चर्चेचे प्रमुख मुद्दे होते.

आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथे गेले. इथिओपियाचा दौरा करणारे तिसरे तर गेल्या 45 वर्षांत इथिओपियाचा दौरा करणारे ते पहिले राष्ट्रपती ठरले. यापूर्वी 1965 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती एस. राधाकृष्णन आणि 1972 मध्ये व्ही. व्ही. गिरी यांनी या देशाचा दौरा केला होता. अदिस अबाबा येथे राष्ट्रपतींनी जे भाषण केले, त्यात इथिओपिया येथे असलेला भारतीय समुदाय हा भारत-इथिओपिया संबंधांचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ या नात्याने भारतीय वंशाच्या नागरिकांनी इथिओपियात योगदान दिले आहे. उद्योजक या नात्याने आर्थिक संधी भारतीयांनी तेथे उपलब्ध करून दिली आहेच; शिवाय स्थानिक नागरिकांचा कौशल्यविकास केला आहे. इथिओपिया हाही भारतासारखाच विविधतेने नटलेला देश आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने तो आफ्रिका खंडातील दुसरा तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने दहावा मोठा देश आहे. वेगवेगळ्या भाषा आणि पाककला, संगीत, नृत्य आणि नाट्यकलेची ही भूमी आहे. भारत आणि इथिओपिया या दोन्ही देशांकडे प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ आहे. युवकांची संख्या दोन्ही देशांत अफाट आहे. दीर्घकालीन आणि सक्रिय संपर्काच्या दृष्टीने भारत-इथिओपिया यांच्यातील करारांवर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. इथिओपियाशी भारताचे व्यवहार अनेक शतकांपूर्वीपासून सुरू आहेत, याची आठवण राष्ट्रपतींनी करून दिली. पहिल्या शतकातील प्राचीन अकसूम साम्राज्याच्या वेळेपासून हे व्यवहार सुरू आहेत. आर्थिक संबंधांमध्ये व्यापार, खासगी गुंतवणूक आणि पायाभूत संरचनांच्या उभारणीसाठी अल्प व्याजदरात कर्ज या योजनांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली, तोच मुळी इंडिया बिझनेस फोरमने आयोजित केला होता. भारतात 2015 मध्ये झालेल्या भारत-आफ्रिका शिखर संमेलनाची आठवण त्यांनी करून दिली तसेच आफ्रिकेला पुढील पाच वर्षांमध्ये 10 अब्ज डॉलरचे अल्प व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणाही केली. 60 कोटी डॉलरचे अनुदान देण्यास भारत वचनबद्ध असून, त्यातील 10 कोटी डॉलर भारत-आफ्रिका विकास कोशासाठी तर एक कोटी डॉलर भारत-आफ्रिका आरोग्य कोशासाठी असतील. इथिओपिया आणि आफ्रिकेतील इतर देशांमधील व्यावसायिकांना भारतासोबत भागीदारी करण्याचे आमंत्रणही राष्ट्रपतींनी दिले, जेणेकरून दोन्ही बाजूंना या भागीदारीचा फायदा होऊ शकेल.

वस्तुतः 2015 मध्ये झालेल्या भारत-आफ्रिका शिखर परिषदेच्या वेळीच आफ्रिकेशी भारताच्या असलेल्या जुन्या संबंधांचा विस्तार करण्याचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. साम्राज्यवादाशी दोन्ही देशांनी केलेला संघर्ष तसेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेली दोन्ही ठिकाणची विकासयात्रा हे आफ्रिका आणि भारतातील प्रमुख दुवे आहेत. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या साम्राज्यवादविरोधी तसेच वंशवादविरोधी धोरणामुळे भारत-आफ्रिका संबंधांना बळकटी दिली. आफ्रिका भारताचा नैसर्गिक मित्र ठरला. भारताने नुकतीच तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्य कार्यक्रमांतर्गत 40 देशांमध्ये विखुरलेल्या 137 योजनांच्या अंतर्गत आफ्रिकेला साडेसात अब्ज डॉलर मदतीची घोषणा केली आहे. अल्पविकसित आफ्रिकी देशांसाठी भारताने शुल्कमुक्त व्यापार अधिक सुकर करण्याचाही प्रस्ताव दिला आहे. परंतु तरीही आफ्रिकेबरोबर भारताचा व्यापार खूपच कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. या क्षेत्रात आर्थिक संबंधांचा नवा अध्याय सुरू करण्याच्या दृष्टीने भारत आफ्रिकेशी विकासात्मक भागीदारी करू इच्छितो. अर्थात आफ्रिकेतील तेलसाठे सुरक्षित करण्यासाठी आर्थिक आणि लष्करी मदत देण्याची चीनची चाल भारताला नाराज करणारी आहे. आफ्रिकेतील भारताची स्थिती चीनपेक्षा अद्याप बरीच कमकुवत आहे. सरकारी यंत्रणेच्या विविध स्तरांवर जेथे चीनचे अस्तित्व आफ्रिकेत जाणवते, तेथे भारत अजूनही खूप मागे आहे. तेथील सरकारी यंत्रणेसोबत काम करण्यात भारताला अद्याप यश आलेले नाही. आर्थिक आघाडीवर ही पोकळी भरून काढण्याचा भारताला प्रयत्न करायचा असेल, तर तेथील सरकारी यंत्रणा आणि उद्योगांमध्ये भारताला अधिक सक्रियता दाखवावी लागेल. अर्थात, उशिरा का होईना भारताच्या अजेंड्यावर आफ्रिका खंड आला आहे, ही खूप आश्‍वासक बाब आहे.

khedtimes.today |
पुणे : लिंगायत संघर्ष समिती, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान, पुणे प्रणित महाराष्ट्र वीरशैव लिंगायत संघटना पुणे शहर तर्फे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा, बाजीराव रोड येथे डॉ. विनोद शहा यांना स्वर्गीय विलासराव देशमुख समाजज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, रुपये ५००० रोख, स्मृतीचिन्ह असे होते. उल्हास पवार यांच्या हस्ते डॉ. विनोद शहा यांना स्वर्गीय विलासराव देशमुख समाजज्योती पुरस्काराने सन्मानित केले. या वेळी मोहन जोशी, अभय छाजेड, अंकुश काकडे, सुनील रुकारी, ज्योती चांदेकर, अनिल कसबेकर (स्वामी), लक्ष्मीताई घोसके, लीलाताई गांधी, नरेंद्र व्यवहारे, आशिष व्यवहारे यांच्या उपस्थित सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन नरेंद्र व्यवहारे यांनी केले. सूत्रसंचालन माणिक सोनवलकर यांनी केले तर आभार सांताराम परडे यांनी मानले.

khedtimes.today |
गुंडाळवाडी (ता.खेड) : येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवदीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एक घर - एक दिवा या संकल्पनेतून या वर्षीचा सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला.

'चला एक दिप लावू शिवचरणी' या भावनेतून हा सोहळा गेली ३ वर्ष साजरा होत आहे. लोकांचा देखील सहभाग लाभतोय. गावातील तरूणींनी उगवत्या सुर्याची रांगोळी साकारली होती. संतोष भोर यांनी छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करून दिप प्रजोलनाचा कार्यक्रमाला सुरूवात केली.

गावातील प्रत्येक तरूणाने एक एक दिप पेटवून सर्व परिसर प्रकाशमय करून टाकला. कार्यक्रमाला अमोलभाऊ भोर, अभय राखुंडे, सुनिल भोकटे, संतोष भोर, अमोल राषुंडे, जगदिशबाबा सावंत, प्रमोद जैद मान्यवर उपस्थित होते.

  • वाचा सविस्तर यादी

khedtimes.today |

सिध्देगव्हाण

चौधरी साधना प्रकाश ( सरपंच )
साबळे वृषाली अनिल
मोरे अनिता उमेश
चौधरी निलेश शामराव
गाडे मोनिका नितीन
गंगावणे अशोक बंडू
गायकवाड नंदा सुनिल
मोरे अशोक रामचंद्र

देवोशी

बच्चे विजय विठ्ठल (सरपंच)
लव्हाळे राजू प्रभाकर
बच्चे कविता सदाशिव
दिवेकर काशिनाथ मारूती
कढणे कविता निलेश
बारणे सरस्वती प्रदिप
बच्चे साधना कैलास
बच्चे दिनकर नामदेव

साकुर्डी

सुपे ज्योती रोहिदास (सरपंच) 
लोहकरे वैभव सिताराम
वर्ये सविता विठ्ठल
चौधरी सुरेखा बाळशिराम
भवारी किरण जगन्नाथ
चौधरी विनायक बाळू
सुपे ज्योती रोहिदास
तळपे किरण ज्ञानेश्वर


अनावळे

शिंगोटे मनोहर दारकु (सरपंच )
जाधव पुजा विष्णू
जाधव उज्वला हरिभाऊ
कुडेकर विलास रामभाऊ
जाधव सुमन मधुकर
होले तुकाराम चिंधु
शिंगोटे बबुशा खंडू
होले आशा प्रकाश


येणिये खुर्द

भालेराव चंद्रकांत महादेव (सरपंच)
बांबळे दामु हरिभाऊ
भालेराव नंदा चंद्रकांत
जाधव पार्वताबाई सिताराम
आतकर नवनाथ किसन
जाधव रामदास दिलीप
बांबळे बुधाबाई ज्ञानेश्वर
आतकर सुवर्णा संतोष

चास

मुळुक सखू बबन (सरपंच)
गायकवाड भीमराव बाजीराव
तांबोळी परविन समिर
रासकर रेश्मा संदीप
कदम सुषमा बाळशिराम
होले शारदा बाबाजी
मुळुक विनायक भाऊसो.
वाळुंज नवनाथ दत्तात्रय
चासकर विमल विलास
ढमढेरे संदीप भगवान


बहुळ

वाडेकर गणेश शंकर (सरपंच)
शेंडे अर्चना अनिल
वाडेकर संगिता नवनाथ
वाडेकर पंडित दिनकर
आरेकर दिपाली गणपत
खलाटे रूपाली कल्याण
साबळे अंकुश प्रभु
पानसरे पुजा शिवाजी
पानसरे सत्यवान आनंदा
पानसरे समाधान बबन
वाडेकर आदिक बबनराव
वाडेकर बेबी मोहन


दौंडकरवाडी

लांडे शकुंतला वामन (सरपंच)
गायकवाड अश्विनी नवनाथ
दौंडकर पुप्षा शहाजी
कड शरद पोपट
गुजर सिताराम आनंद
गुजर पूजा बाबासाहेब
दौंडेकर जयहिंद संताराम
म्हांबरे रूपाली नवनाथ
लांडे सुरेखा विठ्ठल
लांडे गणेश साहेबराव


आव्हाट

किर्वे सोमा भिकाजी (सरपंच)
आढारी शशिकांत ज्ञानेश्वर
शिंदे पुनम गणेश
बुरूड कल्पना सुरेश
बुरूड रमेश देवराम
वाळुंज अंबर रामचंद्र
चपटे अश्विनी दिनेश
बुरूड रोहिदास तुकाराम
वासाळे सीमा संतोष
वाळुंज चंद्रभागा अंबर


शेलगाव

आवटे नागेश नवनाथ (सरपंच)
क्षिरसागर सपना विशाल
आवटे सुरेखा हनुमंत
हांडे रंजित सुभाष
आवटे बाळूबाई ज्ञानोबा
आवटे अलका रमेश
आवटे कैलास सुदाम
पवार स्वामीनाथ दत्तात्रय


आंभु

लोहोट विनोद लक्ष्मण (सरपंच)
कांबळे वत्सला ज्ञानदेव
लोहोट संतोष बबन
राजगुरव शिवाजी भगवान
मोहन सिमा सुभाष
लोटे लक्ष्मीबाई उर्फ शैला शांताराम
राजगुरव ताराबाई गणपत
घुडे किसन जिजाराम


गारगोटवाडी

बच्चे वर्षा मनोहर (सरपंच)
गारगोटे सिमा अतुल
गारगोटे राहूल भानुदास
गारगोटे सावळेराम धोंडीबा
कंद माया दत्ता
काळोखे रोहिणी नवनाथ
गारगोटे नेहा माणिक
शिंदे सुखदेव लक्ष्मण


मिरजेवाडी

बुटे बाळासाहेब हरिभाऊ (सरपंच)
वाळुंज शितल दत्तात्रय
घनवट राजश्री संतोष
घनवट शुभांगी आत्माराम
बुटे योगेश कोंडीभाऊ
वाळुंज दत्तात्रय विष्णु
जाधव ज्योती हनुमंत
घनवट संजय बारकु


मांजरेवाडी

मांजरे अनिता विलास (सरपंच)
मलघे मोनिका शंकर
मलघे सुरेखा भगवान
मलघे सतिश निवृत्ती
मांजरे कल्पना विलास
मांजरे कमल दशरथ
मांजरे शरद महादेव
मांजरे मयुरी जयसिंग
मांजरे सुमन सुरेश
मांजरे गणेश सुरेश

सुरकुंडी

वाजे शशिकांत नंदु (सरपंच)
प-हाड सिताबाई लक्ष्मण
प-हाड सयाजी संभाजी
वाजे तानाजी सहादु
वाजे पार्वताबाई विठ्ठल
सोनवणे पंढरीनाथ ज्ञानेदव
पवार संगीता शंकर
कडलग मंदा कैलास


कोरेगाव खुर्द

गाळव कैलास शांताराम (सरपंच)
गावडे सिताबाई महादू
गाळव रत्ना कैलास
गावडे हिरामण दादू
झांबरे राजु नारायण
गावडे सहिंद्रा राजाराम
कडूसकर राणी संतोष
शेळके मनिषा संदीप
काळे सुरेश विठोबा


येलवाडी

बोत्रे हिराबाई दत्तु (सरपंच)
सातव लिना संदीप
गाडे रंजित विठ्ठल
गाडे सागर नंदु
गाडे वर्षा बाळु
गाडे कल्पना संभाजी
बोत्रे विक्रम दिलीप
गायकवाड प्रदीप वसंत
गायकवाड प्रमिला बाजीराव
बवले दिपाली अमित
गाडे तानाजी मधुकर
बोत्रे रेखा सोपान


बहीरवाडी

राक्षे जगन्नाथ विठ्ठल (सरपंच)
गोसावी निर्मला सुभाष
शेडाणे छाया रामदास
वाघुले बारकु नामदेव
राक्षे जिवन सोपान
भालेराव अनिल शिवाजी
भालेराव मिलाबाई रोहिदास
राक्षे आशाबाई काशीनाथ


वाडा

लांडगे रघुनाथ सदाशिव (सरपंच)
हिले मनिषा गणेश
हुंडारे किरण शंकर
सुरकुले ज्ञानदेव काशिनाथ
केदारी कुमुदीनी सुनिल
खानविलकर लक्ष्मण गोविंद
सुपे राधिका राजाराम
कहाणे सुरेखा शशिकांत
भालेराव दत्तात्रय तुकाराम
घनवट शिल्पा सुनिल
लांडगे गणेश सोपान
केदारी अनिल दादाभाऊ
सुपे कविता विजय
पावडे आशा संदिप


साबळेवाडी

साबळे रेखा विजय (सरपंच)
शेंडे शितल संतोष
पगरकर नंदा अशोक
साबळे सागर मोहन
साबळे रायबा बबन
काटकर रतन चंद्रकांत
साबळे सिमा काळुराम
काटकर तुकाराम

शिरोली

केदारी संगिता संपत (सरपंच)
सावंत सोनाली सुरेश
शिनकर अलका गणपत
सावंत विजय तुकाराम
देवकर संतोष यल्लाप्पा
दजगुडे जया काळूराम
वाळुंज हिरा दत्तात्रय
वाडेकर संदीप भिवसेन
वाडेकर जितेंद्र ज्ञानेश्वर
थिगळे गणपत आनंदराव
शिंदे शुभांगी बारकू
केदारी काळूराम किसन
सावंत उर्मिला दत्तात्रय


भांबोली

निखाडे सागर तुकाराम (सरपंच)
लांडगे भरत भिमाजी
वाडेकर स्वाती भरत
कडाळे अंकुश श्रीपती
राऊत ललीता मालाजी
निखाडे कांता मच्छिंद्र
राऊत निता गोविंद
राऊत देवदास भास्कर

पापळवाडी

शिंदे रेणुका महिंद्र (सरपंच)
चव्हाण सचिन लक्ष्मण
शिंदे सिमा अशोक
चव्हाण वैशाली दत्तात्रय
चव्हाण योगेश सुभाष
चव्हाण अरूण चिंतामण

टीप : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये रिक्त जागांचा समावेश नाही.

khedtimes.today |

महाराष्ट्राचा औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने विकास होत असताना अनेक गावे एम.आय.डी.सी. झोनमध्ये आली. खेड तालुक्यातील देखील अनेक गावांचा कायापालट होत नंदनवने उभे राहिली. या गावच्या कारभा-यांचा एक वेगळाच थाट पाहायला मिळू लागला. परंतु गावचा कारभार स्वखुशीने तरूणांच्या हातात देणारी भांबोली ग्रामपंचायत एकमेव आहे. ‘जागे व्हा’ या नाटकातून माजोरी राजकीय सत्तेवर आसूड ओढत वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी भांबोली गावच्या सरपंचपदी बिनविरोध सागर निखाडे विराजमान झाले आहेत. त्यांच्या दैदीप्यमान प्रवास ‘खेड टाइम्स’ ने उलगडला आहे. त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत....

प्रश्न : सध्याच्या युगात लोक पद, सत्तेसाठी कोणत्याही स्तरावर जातात. मग आपण बिनविरोध निवडून येण्याची किमया कशी साधली?
सागर निखाडे : तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आजकाल लोक पद, सत्ता, पैशा यासाठी काहीही करायला तयार असतात. खरं तर मी बिनविरोध निवडून येईल, असे मला कधीच वाटले नव्हते. परंतु गावातील सर्वच स्तरातील लोकांनी माझ्यासाठी आग्रह धरला. त्यामुळे हे शक्य झाले. गावातील लहान मुलांपासून ते सत्तर वर्षाच्या व्यक्तीशी माझे एक वेगळे नाते निर्माण झाले आहे, हा त्याचाच परिणाम आहे. गावातील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व इतर कार्यक्रमांमध्ये सामाजिक काम करत आलो आहे. त्याचीच ही फलश्रुती आहे.

प्रश्न : वारकरी सांप्रदाय व नाटकांमध्ये रमणारा एक कलाकार माणुस राजकारणात कसा आला? इथपर्यतचा प्रवास कसा होता?
: घरातून माझ्यावर वारकरी सांप्रदायाचे संस्कार झाले. वैष्णव धर्माशी नाळ जोडली गेली आहे. नाटक म्हणाल तर आम्ही ‘वडवानल’च्या माध्यमातून अनेक पथनाट्य, एकांकिका, शॉर्टफिल्म तालुक्यातील कलाकार, कवी, लेखकांना सोबत घेऊन करत आहे. ‘वडवानल’ म्हणजेच समुद्राला लागलेली आग अर्थात प्रवाहाच्या विरूध्द दिशेने जाणारी माणसे. याच माणसांचे आम्ही संगठन करतो आहे. ‘जागे व्हा’ नाटकातून खरी राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली, अशी मी मानतो. या नाटकाच्या माध्यमातून जनतेला जागे व्हा म्हणत, समाजकारणाचे व विकासाचे घोडे पाण्यात भिजवत ठेवत या राजकारणी लोकांनी कसे स्वार्थी, आपलकोंडी राजकारण करत आले आहेत, यावरती आम्ही भाष्य केले आहे. हे सर्व लोकांना आपण सांगतो आहे. परंतु खरचं काही बदल घडवायचा असेल तर आपण हे बदलवू शकतो. त्यामुळे ती राजकारणात आपण समाजकारण, विकासकारण करूयात, या उद्देशाने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि यश ही मिळाले.

प्रश्न : आपल्या स्वत:ला सिद्ध करत असताना कोणत्या व्यक्तीचा जीवनावरती प्रभाव पडला?
: मी खरा घडलो तर ‘वडवानल’च्या तालमीत. ‘वडवानल’नेच खरे आयुष्य काय असते, हे दाखवले. त्याचबरोबर माझ्या जीवनावर दिपक मांडेकर या प्रगल्भ व्यक्तीचा खूप प्रभाव आहे व येथून पुढेही असेल. आई, वडील, भाऊ कैलास निखाडे व माझा गाव यांचाही कळत नकळत प्रभाव पडला आहे. त्याचबरोबर ‘वडवानल’च्या प्रत्येक शिलेदाराकडून मी रोज नवे काहीतरी शिकत असतो.

प्रश्न : जनतेने विश्वासाने गावचे कारभारी केले आहे. त्यांच्या विश्वास सार्थ ठरवण्यासाठी विकासाचा अजेंडा काय असेल?
: गावचा विकास ब-यापैकी झाला आहे आणि भरपूर बाकी आहे. गावातील जिल्हा परिषद शाळा स्वयंपूर्ण व सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहे. दलित वस्त्यांवरती काही मुले शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांच्या पालकांची मानसिकता बदलून, ती मुले शाळेत कशी येतील, यावरती भर देणार आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आणणार, रस्त्यांचे कॉक्रीटीकरण व दशक्रिया घाट सुशोभित करणार. गावातील ड्रिनेज लाईन व रस्त्यांवरील दिवे खराब झाले आहेत, ते योग्य पद्धतीने दुरूस्त करून घेणार आहे. त्याचबरोबर गावातील युवकांना शंभर टक्के रोजगार कसा मिळेल, यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.

प्रश्न : आगामी वाटचाल कशी असेल?
: गावाने स्व:खुशीने सरपंच केले आहे. त्यांचे खूप आभार मानतो. त्यामुळे गावात पुन्हा निवडणूक लढवणार नाही. गावातील युवकांना संधी देईल आणि त्यांना गावच्या विकासाच्या संदर्भात माझी नेहमीच साथ असेल. पंचायत समिती, बाजार समिजी याचा अजून विचार केलेला नाही, परंतु संधी जर मिळाली तर त्या संधीचे सोने नक्कीच करीन. कोणत्या राजकीय पक्षात जायचे याचा देखील विचार केलेला नाही. पण शरदभाऊ बुट्टे पाटील यांच्यासोबत कायम असेल. फक्त विकासकारणाला माझी साथ असेल.

- शुभम वाळुंज, राजगुरूनगर

khedtimes.today |
पुणे : मुद्रा योजनेच्या माध्यमातून लाखो तरुण स्वयंरोजगाराकडे वळत आहेत.या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचे भांडवल लागत नसल्यामुळे तरुणांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळे तरुणांनी या योजनेचा लाभ घेऊन रोजगार मिळवण्यापेक्षा रोजगारनिर्मिती करून स्वाभिमानाने जगावे, असे प्रतिपादन केंद्रीय मानवसंसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा प्रशासन पुणे आयोजित 'मुद्रा प्रोत्साहन अभियान', बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे ते बोलत होते.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, महाराष्ट्र बँकेचे मुख्य व्यवस्थापक रवींद्र मराठे, महापौर मुक्ता टिळक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, डीएफएस दिल्लीचे अशोककुमार डोगरा,एमएसएलआरएमच्या मुख्य व्यवस्थापक आर. विमला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे दिनेश डोके आदी मान्यवर तसेच बँकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्व बँकेच्या वतीने विविध प्रकारच्या योजनांबद्दल माहिती देण्यासाठी ३८ स्टॉल्स लावले होते. त्याद्वारे नागरिकांना मुद्रा योजनेविषयी माहिती तसेच रजिस्ट्रेशन करून देण्यात आले. कार्यक्रमात बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांना कर्जवाटप करण्यात आले. सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आला. तसेच मुद्रा योजनेअंतर्गत मंजूर तरुणांना मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले. ‘मुद्रा यशोगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थित लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शासनाच्या विविध योजनाप्रमाणेच मुद्रा योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. यामधून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार व्हावेत हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.कुठल्याही प्रकारचे तारण नसल्यामुळे लाभार्थ्याला याद्वारे कर्ज मिळवणे सोपे जाते.सामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबविण्यात येत आहे. ४ कोटी तरुणांचा पूर्वी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय नसताना त्यांनी मुद्रा योजनेच्या साह्याने व्यवसायात उडी घेतली आहे. मुद्रा योजनेच्या मदतीने सावकाराच्या जाळ्यातून मुक्तता होईल. मुद्रा योजना ही स्वयंरोजगाराचे नवे दालन आहे. 'नव्या भारताची नवी आकांक्षा, नवी योजना मुद्रा योजना' अशी घोषणा जावडेकर यांनी दिली.

khedtimes.today |
पुणे : घरातील बिकट परिस्थितीवर मात करून मंगोलिया येथे झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या महेंद्रचे काम सध्याच्या तरुणांना प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या महेंद्र चव्हाण याला पालकमंत्री गिरीश बापट यांनी १ लाख रुपये देवून सन्मान केला. यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री म्हणाले, मुळचे चिपळूण तालुक्यातील तळसर येथे राहणाऱ्या महेंद्रचे आई वडील अपंग आहेत. त्याचबरोबर त्याची घरची परिस्थिती बिकट होती. अशा परिस्थितीत महेंद्र पुण्यात त्याच्या नातेवाईकांकडे राहण्यास आला. येथे आल्यानंतर त्याने सिंहगड रस्त्यावर असलेल्या एका हॉटेल मध्ये काम केल.

याकाळात तो या हॉटेल मध्येच राहत असे. त्यानंतर त्याला जनता वसाहतीत राहण्यासाठी थोडी जागा मिळाली. त्यानंतर त्याने बांधकाम मजूर म्हणून काम सुरु केल. लहान पानापासून त्याला व्यायामाची आवड असल्याने तो शरीरसौष्ठव या क्रिडा प्रकाराकडे आकर्षिला गेला. बांधकामावर दगड विटा उचलून तो वेटलिफ्टिंग करत होता. आज पर्यंत त्याला विविध स्पर्धेत २०० हून अधिक बक्षीस मिळाले आहेत.

जागतिक स्पर्धेत यश मिळवल्यानंतर त्याचा पुणेकरांकडून योग्य सत्कार झाला नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी त्याला पुढील आयुष्यासाठी उपयोगी म्हणून १ लाख रुपये देत असल्याचे सांगितले. ही सुरुवात असून भविष्यात राज्य पातळीवर तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आणखी मदत करण्याच आश्वासन त्यांनी दिले. अत्यंत कठीण परिस्थितीत महेंद्रने मिळवलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद आहे. असं ही ते म्हणाले.

यावेळी बोलताना महेंद्र चव्हाण म्हणाला, शरीर सौष्ठव स्पर्धेत मिळालेल्या यशानंतर जो आज सत्कार होत आहे. या सत्काराने मी भारावून गेलो आहे. स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्यानंतर माझ्या साठी राष्ट्रगीत वाजवण्यात आलं तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता. स्पर्धेचा अनुभव सांगताना तो म्हणाला, या स्पर्धेत जवळपास ४० देशांच्या ५०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

त्यामुळे ही स्पर्धा कठीण होती. पण मला माझ्यावर आत्मविश्वास होता. मला मिळालेल्या या यशाला शॉर्टकट नाही असे सांगत त्याने या यशा पाठीमागे गेल्या १५ वर्षाची मेहनत असल्याचे सांगितले. जिल्हा क्रिडा अधिकारी मनोज संतान यांनी महेंद्र ला जिल्हा प्रशासनामार्फत मदत करण्याचे आश्वासन दिले.

  • जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे निर्देश

khedtimes.today |
पुणे : हडपसर-सासवड-जेजुरी हा पालखी रस्ता असून या रस्त्यावरील खड्डे तसेच अन्य दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

येथील शासकीय विश्रामगृहात हडपसर-सासवड-जेजुरी तसेच मंतरवाडी-पिसोळी-कोंढवा रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांची आढावा बैठक आज जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या रस्त्यांच्या दुरुस्तीसंबधी कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता जे. बी. चवरे, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता नम्रता रेड्डी, संबंधित परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

या बैठकीत, हडपसर-सासवड-जेजुरी या मार्गावरील खड्डयांच्या दुरुस्तीचा विशेष आढावा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतला. रस्ते दुरुस्तीच्या कामात सर्व शासकीय यंत्रणांनी ताळमेळ ठेवावा, रस्ते दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घ्यावे, आवश्यक असेल तेथे काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून रस्ता दुरुस्तीचे काम करावे, रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीने रस्त्याची दुरुस्ती करणे इत्यादी काम करण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्र्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे त्वरीत काढण्याची सूचना त्यांनी केली.

मंतरवाडी-पिसोळा-कोंढवा रस्त्याच्या कामाला अंदाजपत्रकात अनुदान मंजूर करण्यात येऊनही, विविध विभागांनी आवश्यक परवानग्या प्राप्त न केल्याची गंभिर दखल जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतली. यासाठी गरज पडल्यास शॉर्ट टेंडर काढणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्री महोदयांची या कामास मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी केली. कात्रज-कोंढवा-उंड्री-पिसोळी-मंतरवाडी राज्य मार्गावरील ७१ ते ७३ किमी दरम्यान हाती घेण्यात येणाऱ्या ४८ कोटी ७१ लाख रुपयांच्या तसेच ७३ ते ७६ किमी दरम्यानच्या १५ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रगतीचा आढावा यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतला.

 

khedtimes.today |
पुणे : पुण्याचा स्वतंत्र फिटनेस ट्रेनर फहद खान यानी अमेच्योर ऑलंपिया क्लासिक बॉडीबिल्डिंग मध्ये सहावा स्थान पटकावले. फहद यानी हे यश १८१ सेमी प्लस केटेगरीत मि‍ळविले. या गटात स्पर्द्धे च्या टॉप सहा फायनेलिस्ट मध्ये स्थान मिळविणारा फहद हा एकमेव भारतीय आहे. या स्पर्धेत भाग घेणारे इतर देश म्हणजे इराण, इराक, कुवैत आणि बहरीन होते. फहदला मिळालेले यश भारत आणि पुणे दोघांसाठी अभिमानाची बाब आहे कारण की आपल्या देशात पहिल्यांदा पुण्यात ऑलंपियाज अमेच्योर ऑलंपिया या स्पर्धेचे आयोजन झाले आहे.

फहद म्हणतो की, मला या स्पर्धेसाठी सतत ८ महीने जबरदस्त तयारी आणि डाइट करावी लागली. या स्तरावर येण्यासाठी दिवसातून दोनदा मी कसून तयारी करीत असे. गेल्या वर्षी म्हणजे २०१६ त माझा कार अपघात झाला आणि मला हेयरलाइन फ्रेक्चर देखील झाले. त्यामुळे मला सहा महिन्यासाठी वेटलिफ्टिंग तालमीपासून रजा घ्यावी लागली. या परिस्थितीतून बाहेर पडणे नक्कीच कठीण होते. कारण या एक्सीडेंट नंतर वजन उचलताना मला धाप लागायची. कसेतरी मी पुन्हा वेटलिफ्टिंग सुरू केले आणि इतर काही भाग घ्यायला लागलो. या पूर्वी मी बॉडी पावर एक्सपो २०१५ या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात टॉप १० फायनेलिस्ट्स मध्ये सामील होतो.

फहद पुढे म्हणाला की, या यशाचे संपूर्ण श्रेय माझे कोच उमेश मोहिते यांना जात. मोहिते स्वत: अनेक राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग त्याने घेतलेला आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी तर ते माझासाठी मोठा आधार होते.

विशेष म्हणजे अमेच्योर ऑलंपिया सीरीज पहिल्यांदाच भारतात आयोजित गेली होती. ही स्पर्धा बॉम्बे एक्झीबिशन सेंटर मध्ये १३ ते १५ ऑक्टोबर पर्यंत संपन्न झाली. ह्या इंटरनेशनल बॉडीबिल्डिंग ची संकल्पना आणि विजन १९६५ मध्ये जो वील्डर यांनी मांडले. पारंपरिक पुरूष बॉडीबिल्डिंग बरोबर मेन्स क्लासिक बॉडीबिल्डिंग, मेन्स फिजिक, वीमेन्स बिकिनी फिटनेस एंड वीमेन फिजिक या स्पर्धाही आयोजित होतात. भारतात पहिल्यांदी झालेल्या या स्पर्धेत अमेच्योर ऑलंपिया हे टायटल जिंकण्यासाठी ४० देशांच्या २०० प्रतिस्पर्धकांनी भाग घेतला होता.

khedtimes.today |
चाकण : निघोजे ( ता.खेड ) येथील महिंद्रा व्हेईकॅल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण खेड तालुक्यात राबवत असलेल्या एच.आय.व्ही. एड्स जनजागृती व पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत एच.आय.व्ही. सहजीवन जगणारी मुले व पालकांसाठी विविध मनोरंजन तसेच सण उत्सवाचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून एच.आय.व्ही. सहजीवन जगणारी मुले व पालकांसाठी दीपावली उत्सवाचे आयोजन करून महिंद्रा व्हेईकॅल मॅन्युफॅक्चरर्स लि. कंपनीच्या व्ही.आय पी. लौंग येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

दिवाळी सण हा सर्वांसाठीच महत्वाचा असून लहानापासून ते थोरापर्यंत सर्वांसाठीच आनंदाची उधळण करणारा चैतन्य निर्माण करणारा असतो. जीवनातील व मनातील अंधकार दूर करून सकारात्मक जीवन जगायला सांगतो असाच काही प्रामाणिक हेतू ठेऊन महिंद्रा व्हेईकॅल मॅन्युफॅक्चरर्स लि. ने एच.आय.व्ही. सहजीवन जगणारी मुले व पालकांसाठी दीपावली कार्यक्रमाचे आयोजन आपल्याच अंगणात करून त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करत त्यांच्या मनातील व जीवनातील भीती, व नकारात्माक्तेचा अंधकार दूर करण्याचा एक छोटासा व प्रामाणिक प्रयत्न केला. तसेच हा प्रयत्न निरंतर ठेऊन त्यांचे जीवन सकारात्मक दिशेने वाटचाल करण्यासाठी महत्वाचा ठरेल. तसेच याद्वारे समाजातील एचआयव्ही. बाधीतांविषयीचा असणारा भेदभाव, कलंक, गैरसमज दूर होऊन सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होईल.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा व्हेईकॅल मॅन्युफॅक्चरर्स लि. प्लांटचे प्रमुख नचिकेत कोडकनी, रणधीर देशमुख, यश फौंडेशन चे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या व मुलांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली. नचिकेत कोडकनी यांनी आपल्या मनोगतात दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन कंपनीचा सकारात्मक दृष्टीकोन सांगताना या कामाचे कौतुक केले व जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना व पालकांना दिवाळीच्या भेटवस्तू, मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले.
या नंतर मनोरंजनाच्या कार्यक्रमात महिंद्रा कंपनीचे व यश फौंडेशन स्वयंसेवक यांनी मुलांसोबत नृत्य करून दिवाळीचा मनसोक्त आनंद साजरा करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमात 250 एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्या मुले व पालकांनी सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमाचे आयोजन कंपनीच्या अंगणात करून मुलांना कंपनीच्या गाड्याविषयाची उत्सुकता सांभाळत ती इच्छाहि पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सीएसआरचे उपव्यवस्थापक प्रवीण गुंजाळ, सनी लोपेझ आदि कंपनी अधिकारी व यश फौंडेशनचे स्वयंसेवक उपस्थीत होते.

Page 1 of 37