आळंदी परिसरात डेंगु सदृश्य रुग्णांचे संख्येत वाढ

By October 08, 2017 0
  • आळंदीत डासांच्या साम्राज्याने भाविक नागरिक त्रस्त
  • डेंगु निर्मूलनासाठी जनजागृतीची गरज

khedtimes.today |
आळंदी : येथील आरोग्य विभागाचे दुर्लक्षाने तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात डासांच्या साम्राज्यात वाढ झाल्याने भाविक, नागरिकांत नाराजी पसरली आहे. नित्य नेमाने धुरीकरण आणि फवारणी होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आळंदी येथील भागीरथी नाला, मनकर्णिका नाला, इंद्रायणी नदीचा पूर्व किनाऱ्या परिसरात वाढते झुडपी गवतासह डासांचे साम्राज्याने नागरिकांत नाराजी वाढली आहे. डेंगी निर्मूलनासाठी जनजागृती पालक, नागारिक, शालेय मुले यांचे मध्ये करण्याची गरज परिसरातून व्यक्त होत आहे.

डेंगी सदृश्य आजवर उपचार ; रुग्ण संख्येत वाढ

येथील विविध खाजगी रुग्णालयात अनेक नागरिकांसह आळंदीतील पदाधिकारी डेंगी सदृश्य आजवर उपचार घेत आहेत. परिसरातून देखील विविध आजारावर रुग्ण उपचार घेत असून वाढत्या रुग्ण संख्येने येथील खाजगी, सार्वजनिक आरोग्यसेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आळंदी हे तीर्थक्षेत्र असून येथील आळंदी ग्रामीण रुग्णालयात विविध सेवांवर वाढत्या गर्दीने देखील ताण येत आहे. विविध सेवा सुविधांसह औषध पुरवठा तसेच साहित्य आणि सेवकवर्ग वाढविण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे.

मनकर्णिका नाला प्रभावी स्वच्छते पासून वंचित 

तीर्थक्षेत्र आळंदीत दरमहा लाखो रुपये शहर स्वच्छतेवर खर्च होत असताना येथील भागीरथी नाला, मनकर्णिका नाला, इंद्रायणी नदीचे पूर्व किनारा तसेच पाणी साठवण बंधाऱ्याचे परिसरात राडारोडा पडून असल्याने नदी परिसर देखील प्रभावी स्वच्छते पासून वंचित राहत असल्याने येथून ये - जा करताना नागरिकांना नाक मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. भागीरथी नाल्यावरील वाढते झुडपी गवताचे साम्राज्याने पुढील रस्ता देखील दिसेनासा झाला आहे. मात्र प्रशासन या पासून अनभिज्ञ आहे. यामुळे डासांच्या साम्राज्यात वाढ झाली आहे. जंतू नाशके फवारणी आणि धुरीकरण नित्यनेमाने पावडर टाकली जात नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. याच नाल्यालगत सार्वजनिक स्वच्छतागृहे असून एका ठिकाणी कुलूप बंद मात्र विद्युत पुरवठा दिवे बंद असलेल्या स्वच्छता गृहात रात्रभर सुरु तर स्वच्छता गृहे वापरास खुली सुरु असलेल्या ठिकाणी साधे दिवे देखील सुरु नसल्याने रात्रीचे अंधारात नैसर्गिक विधी करण्यास येणाऱ्या भाविक, नागरिक यांची गैरसोय होत आहे. कुलूप बंद असलेल्या ठिकाणी विद्युत पुरवठा व दिवे सुरु तर वापरास उघडे असलेल्या ठिकाणी विद्युत व्यवस्था बंद असल्याने आरोग्य आणि विद्युत विभागातील कामकाजावर नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. हजेरी मारुती मंदिर ते भोई समाज धर्मशाळा या भागात गवताचे साम्राज्याने रहदारीस अडथळा होत आहे. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था ते मालक आरफळकर यांचे निवास हा भागीरथी नाला मार्ग नियमित स्वच्छ केला जात नसल्याने देखील नागरिक परिसरातील दुर्गंधीने त्रस्त आहेत. 


येथील नागरिक आणि भाविकासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील निधीतून मंजूर असताना देखील वडगाव रस्ता आणि मरकळ रस्ता या दोन ठिकाणी स्वच्छता गृहे मंजूर असताना बांधकाम सुरु करण्यात आले नाही. यामुळे नागरिकांत नाराजी आहे. पुणे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने या बाबत तत्कालीन पुणे विभागीय आयुक्त एस चोक्क्लीगम यांना माहिती देवून लक्ष वेधण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते निलेश घुंडरे यांनी सांगितले. मात्र अद्यापही भैरवनाथ चौक वडगाव रस्ता, मरकळ रस्ता, स्वच्छता गृहांचे (संडासाच्या) आरक्षित जागा मोकळ्या आहेत त्या विकसित कराव्यात यातून नागरिक भाविकांची सोय होईल असे त्यांनी सांगितले.

  • डेंगु निर्मूलनासाठी जनजागृतीची गरज

आळंदी परिसरातील आरोग्य सेवेत सुधारणा व्हावी यासाठी जनजागृती मोहीम सुरु करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. साथीचे तसेच इतर आजार नागरिक-भाविकांना होऊ नये यासाठी नागरिकांनी देखील काळजी परिसरात स्वच्छता ठेवून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या डेंगीच्या जनजागृती साठी परिसरातील शाळा, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनीही सहभाग नोंदविण्याची गरज असल्याचे बोलले जाते. डेंगी सदृश्य आजार रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांमध्ये डेंगीची साथ रोखण्यासाठी डेंगी जनजागरण दिवस साजरा (कोरडा दिवस ) करण्यासाठी प्रभावी जनजागृती होण्याची गरज व्यक्त होत आहे.

Last modified on Sunday, 08 October 2017 15:01