भोसे येथील वीज कार्यालयाला शेतकरी संघटनेने ठोकले टाळे

By October 08, 2017 0
भोसे येथील वीज कार्यालयाला शेतकरी संघटनेने ठोकले टाळे विवेक बच्चे
  • भारनियमनच्या विरोधात शेतकरी संघटनेचा एल्गार

khedtimes.today |
शेलपिंपळगाव : खेड तालुक्यातील विजेच्या मनमानी भारनियमनास कंटाळून शेतकरी संघटनेने भोसे(ता.खेड) येथील विभागीय वीज कार्यालयास अखेर टाळे ठोकले.

खेड पूर्व भागातील संतप्त शेतकरी व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भोसे येथील विभागीय वीज कार्यालयाकडे आपला मोर्चा वळविला व संवेदनाहीन सरकारचा निषेध व्यक्त करीत वीज कार्यालयास टाळा ठोकला. काही दिवसांपूर्वीच खेड येथील वीज कार्यालयात शेतकरी संघटनेच्या वतीने भारनियमनच्या विरोधात निवेदन देण्यात आले होते.

यात प्रामुख्याने वीज भारनियमनाने कांदा व इतर पिकांच्या लागवडीवर होणारा परिणाम, व घरगुती वीजेच्या भारनियमनाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारा परिणाम याकडे लक्ष वेधले होते. निवेदनात घरगुती वीज भारनियमन वेळापत्रकात संध्याकाळी असणारे भारनियमन रद्द करून सकाळी किंवा दुपारी केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही व एक ते दोन महीने कृषी वीज पंपाचे भारनियमन दिवसा रद्द करून फक्त रात्री करण्याची मागणी केली होती, याला एक महीना उलटून गेल्यावरही वीज विभागाने याची दखल घेतली नाही.

सततच्या भारनियमनाने शेलपिंपळगाव, भोसे, काळूस, संगमवाडी, दौंडकरवाडी, मोहितेवाडी, नवीनगाव, वडगाव घेनंद, बहुळ, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, कोयाळी, दौंडकरवाडी या खेड पूर्व भागातील कांदा लागवडी रखडल्या असल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे. रखडलेल्या कांदा लागवडी, येणारा दिवाळीचा सण, विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान याकडे शासनाने व तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अन्यथा याही पेक्षा उग्र आंदोलन करण्याच्या तयारीत शेतकरी संघटना असल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, कार्याध्यक्ष सुभाष पवळे, वस्ताद दौंडकर यांनी दिली.

यावेळी दिगंबर लोणारी सरपंच भोसे, आण्णासाहेब आवटे मा.सरपंच शेलगाव, परशुराम खैरे अध्यक्ष शेतकरी संघटना शाखा काळूस, भरत आरगडे उपाध्यक्ष शेतकरी संघटना शाखा काळूस, रोहिदास दौंडकर, पांडुरंग गायकवाड, कृष्णा वाटेकर, संदीप पोटवडे, सुनिल पोटवडे, दत्तात्रय आवटे, जगन्नाथ चव्हाण, भगवान अंबोले, शंकरराव कौटकर, दत्तात्रय खलाटे, एकनाथ आवटे उपसरपंच शेलगाव, रवींद्र आवटे, संदीप पोटवडे, कांताराम लोणारी, बबनराव दौंडकर, दत्ता सोनवणे, कैलास आरगडे, रामदास आवटे आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Last modified on Sunday, 08 October 2017 14:11