नृत्यमल्हार स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा प्रथम क्रमांक

By October 08, 2017 0
  • ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते गौरव; ५० शाळांचा सहभाग

khedtimes.today |
राजगुरुनगर : सह्याद्री वाहिनी व शरद मल्हार यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘नृत्यमल्हार’ स्पर्धेमध्ये राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते विद्यालयामध्ये हे बक्षीस वितरण करण्यात आले.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहामध्ये दोन महिन्यांपूर्वी या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या आंतरविद्यालयीन जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे पन्नास शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. या लोकनृत्यांचे सह्याद्री वाहिनीवरही प्रसारण करण्यात आले होते. शुक्रवारी (ता.२९) ‘नृत्यमल्हार’ चे सदस्य व परीक्षक संध्या देशपांडे, आरती केदारी यांनी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्यासह विद्यालयाला भेट देऊन विद्यार्ध्यांशी संवाद साधला. विद्यालयाच्या विविध उपक्रमांचे चित्रीकरण केले. या वेळी विजेत्या संघातील सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊशेठ सांडभोर, शाळा समितीचे अध्यक्ष प्रा. पांडुरंग होले, संचालक शांताराम घुमटकर, हिरामण सातकर, प्रदीप कासवा, बाळासाहेब दिक्षित उपस्थित होते. नेहा साने, सुषमा कल्हाटकर, शितल कड, स्वप्ना वाघुले, सुरेखा होले यांनी नृत्यास मार्गदर्शन केले होते.

विद्यालयाचे प्राचार्य सुनिल जाधव, अधिकारीवर्ग व अध्यापकांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Last modified on Sunday, 08 October 2017 13:07