श्री शिवाजी विद्यालयाचे जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत यश

By October 08, 2017 0
शेलपिंपळगाव (ता.खेड) : विजयी खेळाडूंची फेटा घालून मिरवणुक काढण्यात आली. शेलपिंपळगाव (ता.खेड) : विजयी खेळाडूंची फेटा घालून मिरवणुक काढण्यात आली. विवेक बच्चे

khedtimes.today |
शेलपिंपळगाव : येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत खेड तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत असताना पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

पुणे जिल्हा क्रिडा संचलनालय यांच्या मार्फत १४ व १७ वर्ष वयोगटातील मुले व मुलींसाठी आयोजित जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा नरसिंह विद्यालय रांजणी ता.आंबेगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या खो-खो स्पर्धेमध्ये श्री शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने खेड तालुक्याला जिल्ह्यात प्रथमच विजय मिळवुन दिला.

विजयी संघाला एस.एस.व्ही.स्पोटर्स क्लबच्या सर्व सभासद व प्रशिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याने चार वर्षाच्या त्यांच्या परिश्रमाला या विजयाने यश मिळाले. विजयी संघात अनिकेत बवले(कर्णधार), वैभव दौंडकर, धनंजय दौंडकर, आदित्य दौंडकर, प्रणव सोनवणे, अभिषेक बोंबे, प्रसन्ना थोरात, वैभव पोतले, प्रथमेश दौंडकर, करण लांडे, हृषीकेश मोहिते, विवेक वानखेडे या खेळाडूंचा समावेश होता.

एस. एस. व्ही. स्पोटर्स क्लबच्या वतीने विजयी खेळाडुंची भव्य मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर संघातील सर्व खेळाडू, संघाचे मार्गदर्शक शिक्षक व प्रशिक्षक यांचा श्री शिवाजी विद्यालय व माजी खो-खो खेळाडूंनी शाळेच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला. विजयी संघ पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी शेवगाव जि.नगर या ठिकाणी जाणार आहे, अशी सर्व माहिती एस. एस. व्ही. स्पोटर्स क्लब चे मुख्य प्रशिक्षक अॅड.किरण दौंडकर यांनी दिली.Last modified on Sunday, 08 October 2017 12:54