खेड बाजार समितीला वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार

By October 05, 2017 0
  • पणन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते वितरण

khedtimes.today |
राजगुरूनगर : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाकडून उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणारा स्व. वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार खेड (जि. पुणे) कृषी समितीला पणन सहकार मंत्री सुभाषराव देशमुख यांच्या हस्ते आणि राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या उपस्थित देण्यात आला.

पुणे येथे वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नवनाथ होले, उपसभापती विठ्ठल वनघरे संचालक चंद्रकांत इंगवले, सचिव सतीश चांभारे, सुरेखा मोहिते, सुनील थिगळे यांनी पुरस्कार स्विकारला.

राज्य बाजार समिती सहकार संघाने स्व. वसंतदादा पाटील स्मृती पुरस्काराकरिता राज्यातील बाजार समित्यांकडून केलेल्या विकास कामे व उत्पन्न खर्च वाढावा आदी बाबत प्रश्नावलीचे प्रस्ताव मागितले होते.

या पुरस्काकरीता खेड बाजार समितीची निवड झाल्याबद्दल बाजार समितीचे नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिनिधींनी बाजार समितीचे सभापती नवनाथ होले, उपसभापती विठ्ठल वनघरे, सर्व संचालक मंडळ, सचिव सतीश चांभारे, कर्मचारी यांचे ठरावाने अभिनंदन केले.

Last modified on Thursday, 05 October 2017 10:52