तलवारबाजी मध्ये महात्मा गांधी विद्यालयाची बाजी

By October 02, 2017 0

khedtimes.today |
पुणे जिल्हा स्तरीय तलवारबाजी स्पर्धेत १७ वर्षाखालील व १९ वर्षांखालील गटात राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले अशी माहिती प्राचार्य सुनिल जाधव यांनी दिली.

राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय व पुणे जिल्हा क्रीडा परिषद आयोजित पुणे जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल, येरवडा, पुणे येथे संपन्न झाल्या. तलवार बाजी स्पर्धेतील विजयी संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे.

  • १४ वर्षांखालील मुले/ मुली

१) यश गोपाळे – ईपी – प्रथम

२) यश गोपाळे – सेबर – प्रथम

३) राहुल पुरोहित – फॉंईल – द्वितीय

४) राहुल पुरोहित -  सेबर – तृतीय

५) संजना कारले – ईपी – तृतीय

  • १७ वर्षांखालील मुले/ मुली

१) आर्पिता संजय टाकळकर – ईपी – प्रथम

२) मृणाली रामचंद्र कोहिनकर - ईपी –द्वितीय

३) मृणाली रामचंद्र कोहिनकर – फॉंईल – तृतीय

४) ऋतुजा तांबे - फॉंईल – द्वितीय

५) ऋतुजा तांबे – ईपी द्वितीय

६) दिव्या किसन जरे – सेबर – तृतीय

७) सुरज कोरडे - फॉंईल – द्वितीय

८) शास्वत शिंदे - फॉंईल – तृतीय

  • १९ वर्षाखालील मुली

१) पल्लवी शेटे – फॉंईल प्रथम

२) भक्ती राऊत - फॉंईल – द्वितीय

३) स्नेहल धुमाळ - फॉंईल – तृतीय

४) पल्लवी शेटे - सेबर – तृतीय
सर्व यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख श्री. अशोक सांडभोर, श्री. नितीन वरकड, सौ. कांबळे मँडम व श्री डावरे सर आणि पडवळ सर यांनी मार्गदर्शन केले.

या यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकाचे खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, शाळा समिती अध्यक्ष श्री होले, सचिव श्री जोशी सर, क्रीडा समितीचे अध्यक्ष कैलासराव सांडभोर, यांनी अभिनंदन केले.

Last modified on Monday, 02 October 2017 12:26