दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍यांवर शिमगा

By October 02, 2017 0
  • दुधाच्या खरेदी दरात दोन रूपयांची घसरण

khedtimes.today |
कोयाळी तर्फे वाडा : ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर दूध खरेदी दरात घसरण झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे या दिवाळीत शेतकरी व दुध उत्पादकांवर शिमग्याची वेळ येणार आहे.

खेडच्या पश्चिम भागात शेतीबरोबरच प्रामुख्याने दुग्धव्यवसाय हा महत्वाचा जोडधंदा केला जातो. कहू-कोयाळी, साकुर्डी, चिखलगाव, कळमोडी, औदर, देवोशी, सुरकुंडी, माजगाव या भागातून खाजगी व सहकारी दूग्धसंस्थामार्फत हजारो लिटर दूधाचे संकलन केले जाते व ते पुढे प्रक्रियेसाठी पाठविले जाते.

दूग्धव्यवसायातून शेतकर्‍यांचा चांगलाच फायदा होत होता. मात्र अचानक खाजगी व सहकारी दूध संस्थानी खरेदी दरात २ व ३ रूपये दराने घसरण केल्याने शेतकरी वर्गात नाराजी दिसून येत आहे. दूध खरेदी दरात जरी घसरण झाली असली, तरी मात्र जनावरांचे खाद्य, पेंड, भुसा यांचे दर मात्र दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे दूग्धव्यवसाय करणे अवघड होत आहे, असे शेतकरी व दुध उत्पादक वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

Last modified on Monday, 02 October 2017 12:14