आळंदीत विद्युत व्यवस्थेचे लोकार्पण

By October 02, 2017 0
आळंदी : नगरपरिषद प्रभाग क्रमांक नऊ डोंगरमाथा परिसरात एल.ई.डी. दिवे लोकार्पण करताना करताना नगराध्यक्षा वैंजयता उमरगेकर व इतर मान्यवर. आळंदी : नगरपरिषद प्रभाग क्रमांक नऊ डोंगरमाथा परिसरात एल.ई.डी. दिवे लोकार्पण करताना करताना नगराध्यक्षा वैंजयता उमरगेकर व इतर मान्यवर.

khedtimes.today |
आळंदी : आळंदी नगरपरिषद प्रभाग क्रमांक नऊ आनंद ग्रामच्या मागील डोंगराळ भागातील नागरी दाट लोकवस्तीत गेली सात वर्षांपासून स्ट्रीट लाईटची गैरसोय दूर करण्यात आली. आळंदी डोंगरमाथा प्रभागात विद्युत व्यवस्थेचे लोकार्पण आळंदीचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले.

आळंदी डोंगरमाथा प्रभागात विद्युत व्यवस्था, त्याचबरोबर येथे ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन व पक्के रस्ते आदी अत्यावश्यक नागरी सुविधांपासुन येथील मतदार वंचित राहिले होते. आळंदीत नागरी विकासाची उर्वरित विकास कामे सुरु झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विजयादशमीच्या पूर्व संध्येला आळंदी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते विद्युत व्यवस्थेचे लोकार्पण झाले.

यावेळी नगरसेविका शैला तापकीर, नगरसेवक पांडुरंग वहिले, पाणी पुरवठा व आरोग्य विभाग प्रमुख स्वाती पाटील, विद्युत विभाग प्रमुख दत्तात्रय सोनटक्के आदींसह महिला व उपस्थित होते. परिसरातील रस्त्यावर १०० वँटचे एल.ई.डी.दिवे बसवून तेथील परिसरात विद्युत पुरवठा सुरू केल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी नागरिकांनी उर्वरित विकास कामे मार्गी लावावीत अशी मागणी केली. यात प्रलंबित ड्रेनेज व पक्के रस्ते व पिण्याच्या पाण्याची पाईप व्यवस्था करून द्यावी अशी मागणी करण्यात आली.

 

Last modified on Monday, 02 October 2017 11:25