ईशा आरूडे हिचा सत्कार

By October 02, 2017 0
  • तिरूपती गवळी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

khedtimes.today |
पाईट : येथील नवखंडेनाथ महाराज मंदीरात तिरूपती गवळी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या ईशा शंकर आरूडे हिचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष हिरामन रौंधळ यांनी सांगितले की, आपल्या संस्थेने सभासदाना १० टक्के लाभांश दिला आहे. तसेच घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करून कटू प्रसंग टाळा. ठेवीदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देवू नका. संस्थेचे सभासद तुकाराम कलवडे यांनीही सभेला मार्गदर्शन केले.

संस्थेने २०१५ पासून स्नेहा करंडे या विद्यार्थ्यीनीला दत्तक घेतले आहे. तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च संस्थमार्फत केला जातो. पतसंस्था नेहमीच समाजभिमुख उपक्रम राबवत असते.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल डांगले, मानद सचिव प्रा. गोपीचंद गायकवाड, संचालक शंकर ठाकूर, धोंडीभाऊ शेलार, बबन खेंगले, नंदू डांगले, मारूती साबळे, पार्वताबाई रौंधळ, कविता रौंधळ व सर्व सभासद उपस्थित होते.

सभेचे सुत्रसंचालन प्रा. गोपीचंद गायकवाड यांनी केले. तर अनिल डांगले आभार मानले.

Last modified on Monday, 02 October 2017 10:30