कृषी पर्यटन केंद्र चालक 15 शेतकरी जाणार फिलिपिन्सला

By September 29, 2017 0

khedtimes.today |
बारामती : 5 वी आंतरराष्ट्रीय फार्म टुरिझम कॉन्फरन्स सोमवार (दि. 2), मंगळवार (दि. 3), बुधवार (दि. 4 ऑक्‍टोबर) दरम्यान फिलिपिन्स येथे होत असून त्या कॉन्फरन्समध्ये सहभाग घेण्यासाठी बारामती येथील कृषी पर्यटन विकास संस्था (एटीडीसी) यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषेदेला, महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्र चालक 15 शेतकरी जाणार !!

फिलिपिन्स पर्यटन मंत्रालय, फिलिपिन्स कृषी मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय शाश्‍वत पर्यटन विकास संस्था फिलिपिन्स यांनी संयुक्‍तरित्या ही कॉन्फरन्स आयोजित केली आहे. फिलिपिन्स देशात 2014मध्ये फार्म टुरिझम (कृषी पर्यटन) चा ऍक्‍ट पास झाला असून, कृषी पर्यटन करणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींना खूप अनुदान दिले जाते.

फार्म टुरिझम कॉन्फरन्स दरम्यान, अनेक देशातील कृषी पर्यटन केंद्र चालक येणार असून त्याचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे, वेगवेगळ्या कृषी पर्यटन केंद्राना भेटी सुद्धा दिल्या जाणार आहेत. भारताचे प्रतिनिधित्व कृषी पर्यटन विकास संस्था करणार असून पांडुरंग तावरे यांचे प्रेझेंटेशन सुद्धा होणार आहे, त्यामुळे भारतातील कृषी पर्यटन क्षेत्राच्या घडामोडी जगभरातील आलेल्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत. महाराष्ट्रातील कराड येथील आपले गाव कृषी पर्यटन केंद्राचे काटकर, थेऊर येथील कल्पतरू बाग कृषी पर्यटन केंद्राचे प्रतीक कंद, बारामती येथील बारामती कृषी पर्यटन केंद्राचे भगवान तावरे व सिंधु तावरे, आमखेड (वाशीम) येथील भूमी कृषी पर्यटन केंद्राचे अविनाह जोगदंड, वेरुळे येथील पुंडलिक वाघ, प्रकाश पावडे, नेताजी खंडांगळे, रामचंद्र शेळके, अरुण कुमार क्षीरसागर, सुनील खळदकर यांचा समावेश आहे.

हे 15 जण सिंगापूर मलेशिया येथील कृषी पर्यटन केंद्रांना भेटी देणार असून मार्गदर्शन घेणार आहेत. मलेशिया सरकारचे 927 हेक्‍टर वर पसरलेले मलेशिया ऍग्रीकल्चर पार्क सॅलॅंगोर हे महत्वाचे कृषी पर्यटन केंद्र पाहणार असल्याचे बारामती कृषी पर्यटन विकास संस्थे (एटीडी सी) चे कार्यकारी संचालक आणि कृषी पर्यटन संकल्पने जनक पांडुरंग तावरे यांनी सांगितले.

Last modified on Saturday, 30 September 2017 12:18