विद्यार्थ्यीच आदर्श पुरस्काराचे खरे मानकरी!

By October 05, 2017 0

khedtimes.today |
समाजाचा चेहरा, माणूसपणाची जडण घडण ही शिक्षणांच्या पवित्र मंदिरात होत असते. पुढील पिढ्यांपेक्षा समाजातील बहुतांशी पिढ्या घडविण्याचे प्रभावी कार्य शिक्षक करतात. ज्ञानदानाचे कार्य करणा-या गुरूजनांच्या खांद्यावर समाजातील सर्वच घटक कार्यरत दिसतात. हा शिक्षक समर्थपणे आदर्श विद्यार्थी व देशाचे, राष्ट्राचे पुन:र्रउत्थान करत असतात. ही अशीच कामगिरी करणार्‍या शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्काराने ’ सन्मानित करण्यात येते. यंदाचे मानकरी आदर्श शिक्षक ‘बाबाजी शिंदे’ यांचा समाजनिर्मितीचा प्रवास ‘खेड टाइम्स’ उलगडला आहे. त्यांच्याशी शुभम वाळुंज यांनी केलेली खास बातचीत....

प्रश्‍न : या पुरस्काराचे श्रेय कोणाला द्याल?
बाबाजी शिंदे : या पुरस्काराचे खरे मानकरी विद्यार्थी आहेत. याचबरोबर आई-वडील, कुंटूबांतील सर्वच सदस्य, सहकारी शिक्षक, एकेरीमाळ व टाकळकरवाडीचे सर्व पालक व ग्रामस्थ असतील.

प्रश्‍न : या क्षेत्रात कसे व कधी आले?
 : या शिक्षणाच्या पवित्र गंगेतच आपण आयुष्यभर कार्य करण्याचा चंग बांधला होता. १९९० ला दहावी उत्तीर्ण झालो, त्यानंतर डी. एड. पूर्ण करून मी २० ऑक्टोबर १९९३ मध्ये मी पाबळ येथील एकेरीमाळच्या शाळेवर रूजू झालो. येथूनच ख-या अर्थाने माझ्या ज्ञानदानाच्या कार्याला हळूहळू गती मिळत गेली.

प्रश्‍न : शिक्षणक्षेत्रातील आजपर्यतच्या प्रवासात कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले. आणि काही बरे वाईट अनुभवाबद्दल काय सांगाल?
 : मी एकेरीमाळ शाळेवर आलो तेव्हा तिथे भौतिक सुविधाचा अगदी दुष्काळच होता. शाळची इमारत सुव्यवस्थेत नव्हती. पहिल्यांदा मग मी आपली शाळा मुलभुत सुविधायुक्त कशी करता येईल, यावर लक्ष केंद्रित केले. शासनाच्या माध्यमातून दोन वर्ग खोल्या मंजूर करून, काम पूर्ण केले. परंतु शाळेला सुरक्षा भिंत नव्हती. मग शासनाची कोणतेही मदत न घेता एकेरीमाळ ग्रामस्थांच्या श्रमदानातून आम्ही दगडी सुरक्षा भिंत बांधली आहे. अनुभवाबद्दल सांगायचे झाले तर सगळेच अनुभव चांगले मिळाले. शिष्यवृत्तीचा निकाल चांगल्याप्रकारे मिळवण्यात यश आल्याने टाकळकरवाडीच्या पालकांनी दोन वेळा सोन्याची अंगठी देऊन सन्मानित केले आहे. हाच माझ्यासाठी खरा पुरस्कार होय.

प्रश्‍न : विद्यार्थ्यासाठी कोणते अनोखे उपक्रम राबवले?
 : मी शिष्यवृत्तीसाठी खूप मोठ्या प्रमाणात अनुकूल आहे. याचे कारण या परिक्षेच्या धर्तीवर प्रशासकीय सेवेतील परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती उत्तीर्ण करणे हे माझे पहिले ध्येय असते. याशिवाय ई-लर्निगबद्दल मुलांना नेहमीच कुतूहल वाटेल असे शिक्षण देणे. विशेष म्हणजे निसर्ग कविता शिकवण्यासाठी परिसरात शेतावर जाऊन शिकवणे, खेळांच्या माध्यमातून सामान्य ज्ञान देणे यांसारखे उपक्रम यासारखे उपक्रम आजपर्यत राबवले आणि त्यात यशस्वी झालो.

प्रश्‍न : मागील काही काळात शिक्षकांची प्रतिमा मलिन होत चालली आहे, याबद्दल काय सांगाल?
 : शिक्षकांकडून अनेकदा अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येते. खरं पाहिले तर असे प्रकार घडणे, ही शोकांतिकेची गोष्ट आहे. शिक्षणाच्या पवित्र मंदिरात शिक्षकांकडून होत असलेल्या संबंधित घटनेत ती व्यक्ती दोषी असेल तर तिच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहीजे. संस्कारक्षम शिक्षकांकडून हे होणे योग्य नाही.

प्रश्‍न : आगामी वाटचाल काय असेल?
 : शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळवणे, ‘ई-लर्गिंन’चा वापर करतो आहोत; परंतु संपूर्ण शिक्षण डिजीटल देण्यासाठी प्रयत्नशील असेल. शिष्यवृत्तीचा निकाल अजून कसा वाढेल, यावर लक्ष केंद्रित करणार आहे. विद्यार्थ्यांना इंटरनेट वापरासाठी साक्षर करणार तसेच सामाजिक दृष्टीकोनातून परिपूर्ण विद्यार्थी कसा घडवता येईल, याचा अखेरपर्यत प्रयत्न राहिल.

- शुभम वाळुंज, राजगुरूनगर

Last modified on Thursday, 05 October 2017 13:58